18 वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा मानसशास्त्रीय अभ्यास
प्रा. डॉ. दिनेश रा. जारोंडे
मानसशास्त्र विभाग प्रमुख,
इंदिरा महाविद्यालय कळंब,
ता. कळंब जि. यवतमाळ
सारांश (Abstract) –
किशोरावस्था ही मानवी विकासातील अत्यंत महत्त्वाची अवस्था मानली जाते. साधारणपणे 18 वर्षांचे वय हे किशोरावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात येते. या काळात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये अनेक शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बदल घडत असतात. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश 18 वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा मानसशास्त्रीय अभ्यास करणे हा आहे. या संशोधनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील 30 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये ताण, आत्मविश्वास, सामाजिक संबंध आणि भविष्याविषयीची अपेक्षा या बाबींचा अभ्यास करण्यात आला. माहिती संकलनासाठी प्रश्नावली आणि निरीक्षण पद्धतीचा वापर करण्यात आला. संशोधनातून असे आढळले की बहुसंख्य विद्यार्थ्यांमध्ये भविष्याबद्दल सकारात्मक विचार आढळतो. तथापि काही विद्यार्थ्यांमध्ये ताण, चिंता आणि भावनिक अस्थिरता दिसून येते. शिक्षण आणि करिअरबाबत विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात दबाव देखील जाणवतो. या अभ्यासातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशनाची गरज असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
मुख्य शब्द (Key Words) – किशोरावस्था, मानसिकता, विद्यार्थी, ताण
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2603S02V14P013
Download