आदिवासींमध्येस्त्री आरोग्याचा परंपरागत विचार व उपाययोजना आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेचा स्वीकार (गोंड जमातीच्या संदर्भात)

आदिवासींमध्ये स्त्री आरोग्याचा परंपरागत विचार व उपाययोजना आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेचा स्वीकार (गोंड जमातीच्या संदर्भात)

वैशाली केशवराव हटवार

संशोधन अधिछात्रा

रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर

सारांश (Abstract)

   भारतातील आदिवासी समुदायांमध्ये आरोग्य विषयक धारणा सांस्कृतिक परंपरेशी घट्ट जोडलेल्या आहेत. गोंड जमात ही लोकसंख्येने मोठी व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध जमात असून स्त्री आरोग्याबाबत तिच्या पारंपारिक प्रथा, परंपरा, लोकोपचार अत्यंत विशिष्ट आहेत. गोंड जमातीत स्त्रियांचे आरोग्य,पारंपरिक ज्ञान, औषधी वनस्पती, देवदेवता, भूत प्रेत, उपचार, प्रसुती, प्रथा यावर आधारित आहे. आधुनिक आरोग्य सेवा यंत्रणा ग्रामीण व आदिवासी भागांपर्यंत पोहोचत असली तरी तिचा स्वीकार समान प्रमाणात होत नाही. मातृआरोग्य, प्रसुती काळजी, पौष्टिकता, मासिक पाळी, विशिष्ट लोकविश्वास, आणि उपाययोजना प्रचलित  आहेत. उदा. शासकीय आरोग्य सेवा विस्तार, आशा व अंगणवाडी सेविका, आरोग्य मोहिमा, मातृ मृत्यू कमी करण्याचे कार्यक्रम, यामुळे आधुनिक आरोग्य सेवेच्या स्वीकार वाढत आहे. या संशोधनात गोंड महिलांच्या आरोग्यविषयक पारंपरिक धारणा, स्थानिक उपचार, आधुनिक आरोग्य व्यवस्थेप्रती असणारी उपलब्धता, विश्वास, अडथळे स्वीकाराचे नमुने यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.

 या संशोधनात गोंड जमातीत स्त्री आरोग्याशी संबंधित परंपरागत विचार व  उपाययोजनांचा अभ्यास करण्यात आला असून त्यांच्या आधुनिक आरोग्य व्यवस्थेशी असलेले संबंध विशद करण्यात आलेले आहे. या अध्ययनात दोन्ही पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करून स्वीकार वाढवण्याची आवश्यक दिशा सुचवली आहे.

बीजशब्द ( Keywords)

गोंड जमात, स्त्री आरोग्य परंपरागत उपचार, लोकवैद्य मातृआरोग्य, आधुनिक सेवा, सामाजिक विश्वास, आरोग्याच्या स्वीकार. 

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P097

Download