भारतीय ज्ञान प्रणालीचे स्त्रोत, आचार आणि महत्व
प्रा. श्रीरंग दशरथ लभाने
सहाय्यक प्राध्यापक (समाजशास्त्र विभाग प्रमुख)
स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सानगडी जि. भंडारा
Mail ID. shreeranglabhane@gmail.com
सारांश:
भारतीय ज्ञान परंपरेने जगाला विज्ञान, गणित, चिकित्सा व भाषा यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. शुन्याच्या शोधापासुन आयुर्वेदाच्या चिकित्सा शास्त्रापर्यंत तसेच योग, ध्यान व तत्वज्ञानाच्या माध्यमातुन भारतीय परंपरेने जागतिक पातळीचा आपला ठसा उमटविला आहे. आजच्या काळातही भारतीय ज्ञान परंपरेचे महत्व कमी झालेले नाही. योग, ध्यान, आयुर्वेद या शाखांमध्ये जागतिक स्तरावर पुनर्जागरण होत आहे. आधुनिक शास्त्रज्ञ व विचारवंत भारतीय परंपरेच्या तत्वज्ञानातून प्रेरणा घेत आहेत. भारतीय ज्ञान परंपरा ही केवळ प्राचीने संस्कृतीचा वारसा नसुन आजच्या युगातही आपली जबाबदारी उपयुक्त सिद्ध करणारी अमूल्य ठेवा आहे. भारतीय ज्ञान प्रणाली केवळ तात्विक विचारांची जुनी नोंद नसून हजारो वर्षांपासून भारतीय समाजाला नैतिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक मार्गदर्शन करणारी एक अखंड समग्र आणि गतिमान परंपरा आहे. ही प्रणाली धर्म या मुलभूत तत्वावर आधारित आहे जी केवळ उपासना नसून योग्य कर्तव्य आणि नीती दर्शविते.
बिज शब्द: भारतीय ज्ञान प्रणाली, स्त्रोत, आधार, महत्व
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P079
Download