भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये (प्रारंभिक ते उच्च शिक्षणापर्यंत) भारतीय ज्ञान प्रणालीची भूमिका
प्रा. प्रमोद चंद्रभान शेंडे
(समाजशास्त्र विभाग प्रमुख)
श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय,
पालांदूर (चौ.), ता.लाखनी, जि. भंडारा
सारांश :
भारतीय ज्ञान प्रणाली (Indian Knowledge System – IKS) ही भारताच्या सांस्कृतिक, तात्त्विक, वैज्ञानिक व शैक्षणिक परंपरेचा मूलाधार आहे. वेद, उपनिषद, पुराणे, स्मृती, दर्शनशास्त्र, आयुर्वेद, योग, गणित, खगोलशास्त्र, वास्तुशास्त्र, नीतिशास्त्र व शिक्षणशास्त्र या सर्व घटकांचा समन्वय म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली होय. आधुनिक काळात शिक्षण हे केवळ रोजगाराभिमुख न राहता जीवनाभिमुख, मूल्याधिष्ठित व सर्वांगीण विकासाकडे नेणारे असावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या संदर्भात भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये प्रारंभिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करणे अत्यंत आवश्यक ठरते. प्रस्तुत शोध निबंधात भारतीय ज्ञान प्रणालीचा ऐतिहासिक विकास, वर्तमान स्वरूप, शिक्षणातील भूमिका, महत्त्व व उपयोजन यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञान प्रणालीचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P056
Download