भारतीय ज्ञान आणि महिला सक्षमीकरण
प्रज्ञा परिजन दुधे
पीएच.डी. संशोधक, स्नातकोत्तर मराठी विभाग
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
सारांश
भारतीय ज्ञानाचा संबंध हा प्राचीन काळापासून अनेक क्षेत्रामध्ये दिसून येतो. विविध प्रकारच्या, प्रगतीशी अव्दितीय अशी परंपरा भारतीय ज्ञानाला लाभलेली आहे. भारतीय विचारविश्वाचा भक्कम असा पाया या ‘ज्ञान’ संकल्पनेवर आधारलेला आहे. अगदी सुरुवातीच्या काळाचा विचार केला तर वेद, उपनिषदे, आयुर्वेद, वास्तुशात्र व विज्ञान इत्यादी विषयांचा समावेश भारतीय ज्ञानासोबत जुडलेला आहे. भारतीय ज्ञान परंपरा ही फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाला ज्ञान, तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मौलिक वारसा देणारी आहे. या ज्ञानपरंपरेत स्त्रीचे देखील महत्वपूर्ण स्थान राहिलेले आहे. यात स्त्रीच्या बौद्धिक, सामाजिक, आध्यात्मिक अशा सर्व घटकांचा समावेश होत असतो. यामध्ये भारतीय संस्कृती आणि त्या अनुषंगाने त्यांची जीवनशैली यांचा अभ्यास करण्यासाठी या ज्ञान परंपरेचा महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आधुनिक काळामध्ये ‘महिला सक्षमीकरण’ या संकल्पनेला अतिशय महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. समाजात वावरताना स्त्रीयांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, राजकीय न्याय व हक्क मिळावे या मुख्यतः उद्देश.
बीजशब्द : भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्व, महिला सक्षमीकरण, महिला सक्षमीकरणातील विशेष बाबी, जागतिक महिला परिषदा
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P052
Download