मनोरुग्णांचे पुनर्वसन आणि उपचारात्मक समाजकार्य व समुपदेशकाची भूमिका
संशोधक
श्री गणेश हरी पवार
रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर
गोषवारा :
आजच्या शतकात मानसिक आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक मुद्दा बनला आहे. आर्थिक ताण, सामाजिक दडपण, जीवनशैलीतील बदल, कुटुंब व्यवस्था ढासळणे आणि तंत्रज्ञानाधारित जीवन यामुळे मानसिक आजारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. मनोरुग्ण व्यक्तींच्या पुनर्वसनाची प्रक्रिया ही केवळ वैद्यकीय उपचारांपुरती मर्यादित नसून त्यात समाजकार्य, समुपदेशन, कुटुंबीय सहभाग, रोजगार प्रशिक्षण, थेरपी आणि समुदाय आधारित समर्थन या अनेक अंगांचा समन्वय आवश्यक असतो. मनोरुग्णाचे पुनर्वसन म्हणजे मनोरुग्ण व्यक्तीला स्वावलंबन, सामाजिक स्वीकार आणि कार्यक्षम जीवन जगण्यासाठी सक्षम करणे ही सामाजिक आणि मानवीय जबाबदारी आहे. या प्रक्रियेतील उपचारात्मक समाजकार्य व समुपदेशकाची भूमिका निर्णायक ठरते.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P027
Download