भारतीय आश्रम व्यवस्था: जागतिक कुटुंबसंस्थेसाठी मार्गदर्शक

भारतीय आश्रम व्यवस्था: जागतिक कुटुंबसंस्थेसाठी मार्गदर्शक

डॉ. अर्चना खंडागळे

सहयोगी प्राध्यापिका

अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा

सारांश (Abstract)

भारतीय समाजरचनेचा आधारस्तंभ मानली जाणारी आश्रम-व्यवस्था व कुटुंबसंस्था या दोन सामाजिक-सांस्कृतिक संकल्पनांनी भारतीय जीवनपद्धतीचे मूलतत्त्व घडवले आहे. आश्रम व्यवस्था मानवी जीवनाचे चार टप्प्यांमध्ये (ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ, संन्यास) विभाजन करून धर्म, कर्तव्य आणि सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करते; तर कुटुंबसंस्था भारतीय संस्कृतीतील सांघिकता, परस्परावलंबन आणि मूल्यव्यवस्थेचे प्रतिक आहे. प्रस्तुत संशोधनात या दोन संस्थांचे स्वरूप, परस्परसंबंध, ऐतिहासिक विकास, आधुनिक संदर्भातील बदल, तसेच सामाजिक आयाम यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.

भारतीय आश्रम व्यवस्था आणि कुटुंबसंस्था या भारतीय सभ्यतेच्या दोन मूलभूत सामाजिक चौकटी आहेत. आश्रम व्यवस्था जीवनाचे तात्त्विक आराखडे प्रदान करते, तर कुटुंबसंस्था त्याचे वास्तव सामाजिक रूप ठरवते. आधुनिक काळात या दोन्ही संस्थांत मोठे बदल झाले असले तरी त्यांचे मूलभूत मूल्य, सामाजिक महत्त्व आणि मानवकेंद्री दृष्टिकोन आजही समाजव्यवस्थेला दिशा देणारे ठरतात. भारतीय समाजातील सामूहिकता, परस्परावलंबन, कर्तव्य, समाजबंध आणि मूल्याधिष्ठित आयुष्याचा आधार या दोन संस्थांनीच राखून ठेवला आहे.

महत्वपूर्ण शब्द: आश्रम-व्यवस्था, कुटुंबसंस्था, सामाजिक-सांस्कृतिक मूल्ये

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P016

Download