अस्पृष्यता आणि भारतीय संविधान
प्रकाश मोतीराम मेश्राम
पीएच.डी.विद्यार्थी (समाजषास्त्र विभाग)
prakashmeshram109@gmail.com
प्रा. डॉ. अशोक ता. बोरकर
समाजषास्त्र विभाग प्रमुख
रा.तु.म.नागपूर, विद्यापीठ, नागपूर
सारांश – हजारो वर्शापासून अस्तित्वात असलेल्या अस्पृष्यतेच्या अमानवीय प्रथेने भारतीय समाजातील करोडो लोकांचे जीवन दुःखी- कश्टी झालेले आहे. या प्रथेच्याद्वारे सामाजिक विशमता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात भेदभाव दर्षविल्या जाते. आणि मानवी हक्कांचं उल्लंघन होते. म्हणून भारतीय संविधानातील अनुच्छेद 17 अंतर्गत अस्पृष्यतेचा पूर्णतः निशेध केला आहे. अनुच्छेद 15 अन्वये कोणत्याही प्रकारच्या भेदभावास मनाई करण्यात आली आहे. अनुच्छेद 46 द्वारे दूर्बल घटकांचे संरक्षण करण्यात आले आहे. अनेक अनुच्छेदान्वये संरक्षण देण्याचे काम करण्यात आले आहे. याबरोबरच ‘अनुसुचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’ द्वारे राज्याने प्रभावी उपाययोजना केलेल्या आहेत.
प्रस्तुत षोधनिबंधात अस्पृष्यतेची ऐतिहासिक पार्ष्वभूमी, तीचे समाजावर झालेले परिणाम, त्यावरील संवैधानिक करावयाची उपाययोजना तसेच अजूनही अस्तित्वात असलेल्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये कायदा, समाजषास्त्र आणि मानवाधिकार दृश्टीकोणातून विष्लेशण करण्यात आलेले आहे. अंततः केवल कायदे करून चालत नाही. तर त्याबाबत सामाजिक दृश्ट्या जाणीव, तसेच षिक्षण आणि कायद्याची सक्रिय अंमलबजावणी फार आवष्यक आहे.
मुख्य बिंदू – अस्पृष्यता, संविधान, कायदे, अस्पृष्यता निर्मूलन.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2507S01V13P011
Download