सामाजिक माध्यमांचा किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव

सामाजिक माध्यमांचा किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव

Lakshmi A. Patel

Research Scholar

G.T. Patil College, Nandurbar

Mob – 8788500908

E-mail Id lakshmipatel811@gmail.com

सारांश 

प्रस्तुत संशोधन किशोरवयीन विद्यार्थाचे सामाजिक माध्यमांचा मानसिक आरोग्यावर प्रभाव अभ्यासले आहे. आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘जनरेशन अल्फा’ ही पिढी डिजिटल वातावरणात वाढत असून त्यांच्या मानसिक व सामाजिक विकासावर सामाजिक माध्यमांचा लक्षणीय प्रभाव पडत आहे. सामाजिक माध्यमांचा अनियंत्रित वापर काही मानसिक समस्या निर्माण करू शकतो, परंतु विवेकी व मर्यादित वापर विद्यार्थ्यांसाठी सक्षमीकरणाचे साधन ठरू शकतो. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सामाजिक माध्यमांचा सकारात्मक प्रभाव आणि त्यांच्या सामाजिक संपर्क व आत्मविश्वासातील वाढ यांचा अभ्यास करणे हा आहे.

प्रस्तुत संशोधन वर्णनात्मक स्वरूपाचे असून माहिती संकलनासाठी दुय्यम स्त्रोतांचा वापर करण्यात आला आहे. संशोधनातून असे दिसून येते की सामाजिक माध्यमांचा सकारात्मक आणि मर्यादित वापर केल्यास किशोरवयीन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान व सामाजिक संपर्क वाढण्यास मदत होते.

 मुख्य शब्द: सामाजिक माध्यम, मानसिक आरोग्य, किशोरवयीन, आत्मसन्मान, आत्मविश्वास              

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2604S01V14P009

Download