आधुनिक कुटुंब रचनेतील भारतीय महिलांची बदलती भूमिका आणि भारतीय ज्ञान परंपरा

आधुनिक कुटुंब रचनेतील भारतीय महिलांची बदलती भूमिका आणि भारतीय ज्ञान परंपरा

विलास गणेशराव सुर्यवंशी

समाजशास्त्र विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठ नागपूर

सारांश

भारतीय कुटुंब व्यवस्थाचा पाया पितृसत्ताक मूल्यांवर आधारीत राहिला असून स्त्रीची भूमिका कायम दुय्यम राहिली आहे. धर्म, रुढी, सामाजिक प्रथा आणि पुरुषप्रधान विचारसरणी मूळे स्त्रीयांना शिक्षण, संपत्तीवरील अधिकार, निर्णयस्वातंत्र्य व सामाजिक सहभागाच्या संधी मर्यादित मिळाल्या.

परंतू, सामाजिक जागृती, स्त्री-सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, कायदे आणि रोजगार संधी मुळे स्त्री सक्षमीकरणाची प्रक्रिया जोमाने पुढे आली. स्त्रीयांचे आर्थिक स्वावलंबन वाढले, त्यांच्या निर्णयक्षमतेला, नेतृत्वाला आणि वैयक्तीक स्वातंत्र्याला नवा आयाम मिळाला. आधुनिक तंत्रज्ञान, घटनात्मक तरतुदी व समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे स्त्री-पुरुष समानतेची जाण वाढली असून कुटुंबव्यवस्थेत स्त्रीच्या भूमिकेचे पुनर्मुल्याकंन सुरु झाले आहे.

आज स्त्री पारंपारिक भूमिकेपलीकडे जावून शिक्षण, करिअर, व्यापार, राजकिय सहभाग आणि प्रशासकिय नेतृत्व सारख्या विविध क्षेत्रात सक्रियपणे सहभाग घेत आहे. स्त्रीच्या भूमिकेतील बदल हा समाजाच्या समृध्दीचा, प्रगतीची आणि ज्ञानपरंपरेतील परिवर्तनाचा महत्वपुर्ण निर्देशांक ठरतो.

मुख्य शब्द(Keywords):- भारतीय कुटुंबव्यवस्था, पितृसत्ताक व्यवस्था, स्त्री-भूमिका, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक विकास. 

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P101

Download