मुलींच्या शिक्षणासाठी गोंडजमातीत असलेले परंपरागत मूल्यांचे अध्ययन

मुलींच्या शिक्षणासाठी गोंड जमातीत असलेले परंपरागत मूल्यांचे अध्ययन

डॉ. अशोक बोरकर

समाजशास्त्र विभागप्रमुख

रा.तु.म. नागपूर विद्यापीठ नागपूर

तृप्ती मार्गेश गणवीर

संशोधन अधिछात्रा

रा.तु.म नागपूर विद्यापीठ, नागपूर

गोषवारा – गोंड जमात ही भारतातील एक प्रमुख आदिवासी जमात असून तिच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरांना एक विशेष महत्त्व आहे. गोंड समाजात शिक्षण हे केवळ शालेय क्षणापुरते मर्यादित नसून जीवनमूल्य संस्कार, परंपरा आणि व्यवहारज्ञान यांचा समावेश असलेले व्यापक शिक्षण मानले जाते. विशेषतः मुलींच्या शिक्षणाबाबत गोंड समाजात काही परंपरागत मूल्य दिसून येतात. त्यामध्ये कामकाजातील सहभाग, निसर्गाशी सुसंवाद, वडीलधाऱ्यांचा आदर, लोकगीत, लोकनृत्यांद्वारे शिक्षण तसेच “गोटूल” सारख्या सामूहिक संस्थांमधून मिळणारे सामाजिक शिक्षण या मूल्यांचा समावेश होतो.

गोंड समाजातील पारंपारिक शिक्षण पद्धतीत मुलींना स्वावलंबन सहकार्य, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचे बोध दिले जातात. या मूल्यांमुळे त्या घरगुती, सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदाऱ्या समजून घेतात. आधुनिक शिक्षण प्रणाली पूर्णतः वेगळी आहे तिचे स्वरूप पूर्णतः बदललेले दिसून येते सध्याच्या आधुनिक युगात परंपरागत शिक्षण प्रणाली लागू होत नाही.

या संशोधनात गोंड जमातीत मुलींच्या शिक्षणासाठी संबंधित पारंपरिक मूल्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्यांचा आजच्या शिक्षण व्यवस्थेशी असलेले संबंध विशद करण्यात आलेला आहे.

बिजशब्द :- गोटूल, गोंड समाज, पारंपारिक शिक्षण, आदिवासी महिला, मुलींचे शिक्षण

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P092

Download