औष्णिक विद्युत प्रकल्पग्रस्त लोकांच्या सामाजिक व आर्थिक समस्या: कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प (नागपूर, महाराष्ट्र) – एक सामाजिक अध्ययन

औष्णिक विद्युत प्रकल्पग्रस्त लोकांच्या सामाजिक व आर्थिक समस्या: कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प (नागपूर, महाराष्ट्र) – एक सामाजिक अध्ययन

सुनिता शामरावजी गद्रे
___________________________________________________________________________________________________

सारांश (Abstract)

औष्णिक विद्युत प्रकल्प हे देशाच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात; तथापि, अशा प्रकल्पांच्या स्थापनेमुळे आणि कार्यामुळे स्थानिक लोकांच्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय जीवनावर विपरीत परिणाम होतात. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प यांच्या विशेष संदर्भात प्रकल्पग्रस्त लोकांच्या सामाजिक व आर्थिक समस्यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासाचा मुख्य उद्देश प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या ग्रामीण समुदायाच्या जीवनमानातील बदल, आरोग्यविषयक अडचणी, शेती व रोजगारावर झालेले परिणाम तसेच पर्यावरणीय प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या समस्या यांचे विश्लेषण करणे हा आहे.

या संशोधनासाठी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून प्राथमिक माहिती प्रश्नावली, मुलाखती व क्षेत्रीय निरीक्षणांद्वारे संकलित करण्यात आली आहे. दुय्यम माहिती शासन अहवाल, संशोधन लेख, वृत्तपत्रे व पर्यावरणीय अभ्यासांमधून घेण्यात आली आहे. सांख्यिकीय विश्लेषणासाठी टक्केवारी, तक्ते व सहसंबंध (Correlation) पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

अभ्यासातून असे निदर्शनास आले की कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे हवेचे व पाण्याचे प्रदूषण वाढले असून त्यामुळे श्वसनविकार, त्वचारोग व इतर आरोग्य समस्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. शेती उत्पादनक्षमता घटणे, पाण्याची कमतरता, रोजगाराच्या संधींचा अभाव व विस्थापन यामुळे स्थानिक लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. विशेषतः लघु व अल्पभूधारक शेतकरी आणि मजूर वर्ग सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

या अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे सूचित होते की औष्णिक विद्युत प्रकल्पांच्या विकासासोबतच पर्यावरण संरक्षण, प्रभावी पुनर्वसन धोरणे, आरोग्य सुविधा व स्थानिक रोजगार निर्मिती यावर भर देणे अत्यावश्यक आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने शासन, प्रकल्प प्रशासन व स्थानिक समुदाय यांच्यात समन्वय साधणे गरजेचे आहे.

मुख्य शब्द (Key Words)

औष्णिक विद्युत प्रकल्प, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प, प्रकल्पग्रस्त लोक, सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, पर्यावरणीय प्रदूषण, आरोग्य समस्या, शेतीवर परिणाम, पुनर्वसन, शाश्वत विकास

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P091

Download