महाराष्ट्रातील धनगर समाजाची सामाजिक व आर्थिक परिस्थिति
सुधीर लोडे
संशोधक विद्यार्थी
समाजकार्य विभाग
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
सारांश
धनगर समाज हा भारतातील प्राचीन आणि मोठा समाज आहे. त्यांचा प्रमुख व्यवसाय पशुपालन होय. आर्थिक समस्या ह्या ज्यांच्या जशा गरजा असतात तश्या त्या त्या गरजांतून निर्माण होतात. प्रामुख्याने हा समाज मेंढपाळ याच्याशी जोडलेला आहे. ते पारंपरिक शेती आणि लोकरीचे काम करतात. हा समाज इतिहासात नमोल्लेखित आहे. या समाजाचा राजघराण्यांशी संबंध दिसून येतो. त्यांना महाराष्ट्रात विविध नावांनी ओळखले जाते. धनगर समाजाला सांस्कृतिक वारसा आहे. त्यांच्या इतिहासात आणि लोककलेत एक जागतिक मूल्य आहे. धनगर समाज महाराष्ट्रातील विविध भागात वास्तव्यास आहे. आज धनगर समाजात अनेक बदल होत आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बदलातून जात आहे. ते त्यांचा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करत विविध क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण करत आहेत. त्यांचा पारंपरिक पशुपालन व्यवसाया सोबतच इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थलांतर व आरक्षणामुळे या समाजाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आरक्षणाचा मुद्दा धनगर समाजासाठी महत्त्वपूर्ण विषय आहे, आजही यासाठी संघर्ष सुरू आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या या समाजाला विकासाच्या प्रमुख धारेत आणण्यासाठी त्यांना योग्य दिशा आणि संधी मिळणे आवश्यक आहे. सादर शोध निबंधात धनगर समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.
बीज शब्द : धनगर समाज, सामाजिक, आर्थिक
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P087
Download