गोंड आदिवासींच्या रूढी, परंपरा आणि आधुनिकतेशी संघर्ष

गोंड आदिवासींच्या रूढी, परंपरा आणि आधुनिकतेशी संघर्ष

रुची अनिलराव बोरकर, संशोधन अधिछात्रा, रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूर

गोषवारा

भारतात आदिवासी समाजाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीचा पाया जितका प्राचीन आहे तितका इतिहास जुना आहे. गोंड आदिवासी समाज मध्य भारतातील सर्वात मोठा आणि प्राचीन समाज मानला जातो. त्यांच्या रूढी परंपरा, श्रद्धा, लोककला, सण, उत्सव आणि सामुदायिक जीवन पद्धती यातून त्यांच्या समृद्ध संस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडते. गोंड आदिवासी समाजाचे जीवन निसर्गाशी घट्टपणे जोडलेले असून त्यांच्या रूढी, परंपरा या देवदेता आणि श्रद्धा यावर आधारित असून निसर्ग पूजक आहेत. परंतु आधुनिक काळात शहरीकरण, औद्योगीकरण, संस्कृतीकरण, शिक्षण आणि तंत्रज्ञांचा प्रसारामुळे गोंड समाजाच्या परंपरेत जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या बदलांमुळे त्यांच्या पारंपरिक रूढी आणि परंपरा टिकवून ठेवण्याचा व आधुनिक समाजाच्या जुळवून घेण्याची संघर्ष निर्माण झालेला आहे. या बद्लांमुळे काही परपरांचे  पुनर्जीवन करण्याचे प्रयत्न दिसून येत आहे. या संशोधनांमध्ये गोंड आदिवासींशी संबंधित सामाजिक, धार्मिक आणि संस्थेचे प्रश्न चा अभ्यास केला असून आधुनिकतेच्या प्रभावामुळे घडणाऱ्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या अध्ययनातून गोंड समाजाच्या संस्कृतीतील सातत्य परिवर्तन आणि संघर्ष तिन्ही पैलूंचा विश्लेषण केले जाईल.

गोंड आदिवासीं समाजाच्या पारंपरिक मूल्यांचे संरक्षण आधुनिकतेचे समन्वय साधण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांची ओळख आणि समाजातील सांस्कृतिक ओळखीचे महत्त्व स्पष्ट करते अशा प्रकारे हे संशोधन आदिवासी समाजशास्त्र, सांस्कृतिक अध्ययन आणि आधुनिकता या प्रक्रियेतून स्पष्ट केले आहे.

बीजशब्द : गोंड आदिवासी समाजातील रूढी, परंपरा, आधुनिकता, संघर्ष आणि समन्वय साधण्यासाठी विकासात्मक प्रयत्न.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P070

Download