भारतीय ज्ञान परंपरेत मातंग दाईणीचे स्थान व सध्या स्थिती
डॉ. माधुरी ब. चौधरी
संशोधक
mdshankar768@gmail.com
Contact No. :-7559425332
प्रस्तावना
समाजातील धार्मिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात स्त्रिया महत्वाची भुमिका निभावत आहे. जगातील असे कुठलेही क्षेत्र नाही की ते क्षेत्र महिलांनी आपल्या कतृत्वाने पादाक्रांत केले नाही.
आधुनिकीकरण, जागतिकीकरण, महिला सशक्तीकरण, नवतंत्रज्ञान व वैज्ञानिक शोध या सर्वामुळे महिला आपल्या प्रगतीची शिखरे उंचावत आहेत. स्त्रियांची प्रगती होत आहे. त्या प्रगतीत कोणत्या स्त्रिया सहभागी होत आहेत ? ज्यांनी शासनाच्या सवलतीचा लाभ घेतला आहे. त्याच स्त्रियांनी प्रगती केली आहे असे म्हणता येईल कारण आजही आपण जेव्हा ग्रामीण क्षेत्रातील स्त्रियांचा विचार करतो तेव्हा शिक्षण, आरोग्य, उत्पन्न, राहणीमान, निर्णय प्रक्रिया व गतीशीलता या सर्वातच ती नागरी स्त्रीच्या तुलनेत मागासलेली दिसून येते.
वास्तविक पाहता ग्रामीण महिलांचा सहभाग आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाची भर पाडणारा असा आहे. श्रम विभाजनाच्या दृष्टिने पाहिले असता कृषी व्यवस्थेत तिचा वाटा 80 टक्के दिसून येतो. तरी देखील अज्ञान निरक्षरतेमुळे ती अशिक्षित आहे. स्वतःवरील अत्याचार, अन्याय ती मुकाटयाने सहन करीत आहे. याचे तिला भान नाही.
याचे मुळ भारतीय समाज व्यवस्थेत आहे. कारण भारतीय समाज हा पुरूष प्रधान असल्याने स्त्री ग्रामीण असो की शहरी असो त्यांची स्थिती सारखीच!
भारतीय समाज व्यवस्थेतील जातीय उतरंडी हीच स्त्रियांची सामाजिक स्थिति समजण्यासाठी लक्षात येणे महत्वाचे वाटते. प्रथम लिंग मग जाती व त्यानंतर वर्ग अशा तीन स्तरावरून भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांचे शोषण होते जेव्हा आम्ही अनुसुचित जातीच्या स्त्रियांचा विचार करतो तेव्हा त्यांना पराकोटीच्या शोषणास व उपेक्षेस सामोरे जावे लागते. अशाच एक अनुसुचित जातीतील स्त्री आहे ‘मांग’ स्त्री जी परंपरेने सुईण ( दाईण ) चे काम करत होती
येणा-या संदर्भातून मांग स्त्री ही समाजव्यवस्थेसाठी महत्वाची आहे. तिच्या सेवा प्रत्येक स्त्रीस हव्या होत्या व जेव्हा आपण म्हणतो की 40 ते 50 टक्के भारतातील बाळंतपण प्रशिक्षित दाई शिवाय होतात. तेव्हा मांग स्त्रीला आपण दुर्लक्षित करतो पण ती प्रत्येक स्त्रीस सेवा पुरवत असली तरी तिचा दर्जा, तिच्या जातीचा दर्जा व तिचा व्यवसाय हे समाजाने हीन ठरविला आहे.
कि वर्डस् : मातंग स़्त्री, मातंग स़्त्री सुईण ( दाईण ), ग्रामिण, अनुसूचित जाती, बाळंत आजार
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P038
Download