भारतीय ज्ञानपरंपरा आणि समकालीन समाज : बदलती स्थिती, समस्या व उपाय

भारतीय ज्ञानपरंपरा आणि समकालीन समाज : बदलती स्थिती, समस्या व उपाय

प्रा. आशिष आर. बोरकर

प्रभारी प्राचार्य व समाजशास्त्र विभाग प्रमुख

स्व. पार्वताबाई मदनकर कला महाविदृयालय, वरठी

Mail-ID –vimrshborkar2017@gmail.com

Mo.No;-94236719895

सारांश (Abstract) :

            भारतीय ज्ञानपरंपरा ही वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, योग, आयुर्वेद, नीतीशास्त्र, लोकज्ञान व परंपरागत कौशल्यांवर आधारित अशी समग्र व जीवनाभिमुख परंपरा आहे. तथापि, जागतिकीकरण, पाश्चात्यीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण आणि बदलती जीवनशैली यांमुळे समकालीन समाजात या ज्ञानपरंपरेची भूमिका व प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येते. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश भारतीय ज्ञानपरंपरेचे स्वरूप समजून घेणे, समकालीन समाजातील सामाजिक-शैक्षणिक बदलांचा अभ्यास करणे, भारतीय ज्ञानाच्या उपेक्षेमुळे निर्माण झालेल्या समस्या ओळखणे तसेच आधुनिक समाजात तिच्या पुनरुज्जीवनासाठी उपाय सुचवणे हा आहे.

            या अभ्यासासाठी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून दुय्यम स्रोतांवर आधारित माहितीचे गुणात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. अभ्यासातून असे आढळते की आधुनिक शिक्षण व जीवनशैलीमुळे भारतीय ज्ञानाचा वापर कमी झाला असून त्याचा परिणाम नैतिक मूल्यांचा ऱ्हास, पिढीतील सांस्कृतिक दरी, मानसिक तणाव व सामाजिक अस्थैर्य या स्वरूपात दिसून येतो. तथापि, शिक्षणव्यवस्थेत भारतीय ज्ञानाचा समन्वय, योग-आयुर्वेद व ध्यानपद्धतींचा प्रसार, लोकज्ञानाचे दस्तऐवजीकरण, डिजिटल माध्यमांचा वापर आणि संशोधन-नवोपक्रमाशी भारतीय ज्ञानाचा संबंध प्रस्थापित केल्यास या समस्यांवर प्रभावी उपाय शक्य आहेत.

            अभ्यासाचा निष्कर्ष असा की भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक संदर्भात पुनर्संयोजन केल्यास मूल्याधिष्ठित, संतुलित व शाश्वत समाजनिर्मितीस महत्त्वपूर्ण चालना मिळू शकते.

बिजशब्द (Keywords) : भारतीय ज्ञानपरंपरा, जागतिकीकरण, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण, मूल्यशिक्षण, नैतिक व सामाजिक मूल्ये, योग व आयुर्वेद, सांस्कृतिक परिवर्तन, डिजिटल माध्यमे, शाश्वत विकास

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P018

Download