भारतीय संस्कृतीत बौध्द ज्ञान परंपरांचे महत्त्व
अंजूषा रामटेके
पीएचडी संशोधक
रा तू म ना विद्यापीठ नागपूर
8600596731
सारांश
श्रीमद् भागवत मध्ये भारतीय संस्कृतीच्या रहस्य बाबत म्हटले आहे की
वदन्ति यत्तत्वविदस्तत्वं तज्झानम हयम्।
ब्रम्हेति परमात्मेति भगवानिति शब्धते॥
अर्थात एक अद्वैय ज्ञानात्मक तत्वाला परमात्मा ब्रह्मा किंवा भगवान म्हणतात.त्याच तत्वाला ज्ञानदृष्टीने ब्रह्मा, योगदृष्टीने परमात्मा आणि भक्ती दृष्टीने भगवान म्हणतात. योग कर्मात्मक आहे म्हणून ज्ञान कर्म भक्ती भाव यांचा एकत्र असा महासमन्वय आहे. ब्रह्मा निर्गुण, नि:शक्ती, निराकार आहे. परमात्मा, सगुण, सशक्ति, ज्ञानाकार आहे. तिघांचं हे लक्षण भेद आहे परंतु भाव तत्व एकच आहे. भागवतात जे अद्वैज्ञान उल्लेखित आहे. त्याचे विवरण वज्रयान संपद्रायात अद्वयवज्रसिद्धी नामक ग्रंथात आहे. (बौध्द धम्मदर्शन आचार्य नरेंद्र देव)
वस्तुस्थितीची जाणीव असणे, व्यक्ती आणि परिस्थितीची जाणीव असणे, अनुभव शिक्षण कौशल्य याची समज असणे म्हणजे ज्ञान. आपण कुठे काय करू शकतो याचे भान असणे म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे प्रज्ञा,ज्ञान म्हणजे बुद्धी, ज्ञान म्हणजे माहिती, ज्ञान म्हणजे अनुभव आणि ज्ञान म्हणजे संस्कृतीतून मिळालेला एक वारसा. भारतात हजारो वर्षापासून खरंतर सिंधू संस्कृती पासून विकसित झालेले ज्ञान प्रणाली समृद्ध परंपरा आहे.ज्यामध्ये तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र, आरोग्यशास्त्र, खगोलशास्त्र, नृत्य, कला, शिल्प आणि बरेच काही. सिंधू संस्कृती पासून तर सम्राट अशोकाच्या शिलालेखापर्यंत जे ज्ञान अवगत आहे त्या ज्ञानाचा उल्लेख वैदिक संस्कृतीत आहे. या ज्ञान प्रणालीचा भारतीय समाजावर नव्हे तर जागतिक विचारावरही लक्षणीय प्रभाव पडला आहे. वैदिक संस्कृती पासून ज्ञान विज्ञानाची भरपूर सामग्री ज्ञानपरंपरे अंतर्गत भारतातील जनमानसातच नव्हे तर विदेशातही पोहोचली गेली. ज्याला आपण “ वसुधैव कुटुम्बकम” म्हणतो. यावरून असे दिसून येते की ज्ञान हे एकतेचे प्रतीक आहे. भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्व तिच्या समृद्ध आणि व्यापक स्वरूपात आहे. ज्यात संस्कृतीचे जतन, वैज्ञानिक दृष्टिकोनातून समग्र जीवन पद्धती यांचा समावेश होतो. भारतीय ज्ञान प्रणाली द्वारे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले जाते. भारतीय ज्ञान प्रणालीत गुरु शिष्य परंपरा आहे परंतु बौद्ध ज्ञान प्रणालीत आचार्य शिष्य परंपरा आहे. शिक्षा देणाऱ्याला आचार्य किंवा उपाध्याय म्हणतात व शिक्षा घेणाऱ्याला शिष्य म्हणतात. ही परंपरा विनामूल्य कोणतेही दान न स्वीकारता ज्ञानदानाचा कार्य करते. ही एक संघटित प्रणाली आहे. ज्ञान पद्धतशीरपणे एकाकडून दुसऱ्याकडे ज्ञान हस्तांतरण करण्याची परंपरा आहे. भारतीय ज्ञान परंपरेने इतिहास, भूगोल, साहित्यचिकित्सा, सामाजिक मूल्य दर्शन, विज्ञान, कला, संत साहित्यातून जनमानसात पोहोचल्या गेल्या आहे. वेद, उपवेद, अरण्यक, उपनिषद, शास्त्रीय ग्रंथ हे भारतीय ज्ञान व्यवस्थेचा पाया आहे.
की वर्ड्स : ज्ञान, परंपरा, संस्कृती, प्रणाली, हस्तंतरण .
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P015
Download