महाराष्ट्रातील शिक्षण महर्षी महात्मा फुले यांचे कार्य

महाराष्ट्रातील शिक्षण महर्षी महात्मा फुले यांचे कार्य

डॉ.वैभवी प्रकाश देहूकर

सहाय्यक प्राध्यापक,

मराठी विभाग, कला शाखा,द महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे.

मोबाईल:९४२७००२७५८

इमेल : vaibhavi.d-marathi@msubaroda.ac.in

सारांश

           19 व्या शतकात महात्मा फुले यांनी भारतामध्ये स्त्रीशिक्षणाची चळवळ सुरू केली. त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या या क्रांतिकारक विचारामुळे स्त्री शिक्षणाचा प्रारंभ झाला. त्यांनी ही समाजसुधारणेची चळवळ सुरू केली असली तरी त्याला पुढे नेण्याचे कार्य बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे),कोल्हापुरचे राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक विचारवंत,समाजसुधारक यांनी केलेले दिसून येते.

           स्त्री शिक्षणाच्या परिवर्तनवादी विचाराने स्त्री वर्गाची गुलामगिरीतून सुटका होऊन ती स्वावलंबी होऊ शकते,हे महात्मा फुले यांनी  जाणले होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून स्त्री वर्ग आणि समाजातील उपेक्षित वर्ग यांच्या शिक्षणावर भर दिला होता. त्यामुळे हळूहळू स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला आणि स्त्रिया शिक्षण,नोकरी यासाठी घराबाहेर पडू लागल्या. त्यातूनच स्वतःची कारकीर्द घडवू लागल्या. त्यामुळेच आज  21 व्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा वावर आपल्याला दिसून येतो. त्याचे श्रेय महात्मा फुले यांना दिले पाहिजे.

मुख्य शब्द : महात्मा फुले , भारतीय समाज, भारतीय स्त्रियांचे स्थान, स्त्री शिक्षण

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2510S01V13P011

Download