अनुसूचित जातीतील दुर्गम भागातील मागासलेल्या महिलांच्या सक्षमीकरणाची गरज
संशोधक
नांव – कु. अस्मिता विठठलराव क्षीरसागर
शाळा – जि.प.म.उ.प्रा.शाळा, काजेगाव
पं.स.जळगांव जामोद जि. बुलढाणा
मो. – ७५१७०५०७९७
Email id – asmitakokate09@gmail.com
सारांश
भारत हा विश्वात मोठी यशस्वी लोकशाही, सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे. अनुसूचीत जातीचा एक मोठा संवर्ग आपल्या देशाचा महत्वाचा भाग असून त्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची आज काळाला ख-या अर्थाने गरज आहे. एका बहुसंख्य असलेल्याा संवर्गातील महिलांचे त्यांच्या सांस्कृतिक वारसा टिकविण्यामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये मोलाचे स्थान आहे. अनेक जातीधर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदतात. कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मोजमाप हे त्या देशांच्या महिलांनी केलेल्या प्रगतीवर अवलंबून असते. अनुसूचीत जातीच्या स्त्रियांसंदर्भात सांगायचे झाल्यास शिक्षण हे मानसिक गुलामीतून बाहेर पडत स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत करून राजकीय स्वातंत्र आणि सामाजिक दर्जा मिळविण्याचे ते एक धारदार हत्यार आहे आणि त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे. आज भारतात अनुसूचीत जातीतील स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढत आहेत. त्यांचे सक्षमीकरण करणे ही काळाची गरज आहे. अनुसूचीत जातीच्या महिलांना अनेक कौटूंबिक, आर्थिक, सामाजिक, शारिरीक, राजकिय अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचा सामाजिक दर्जा पाहता, अदयापही ग्रामीण भागातील अनेक स्त्रिया निर्धन, निरक्षर व पुरूषांच्या तुलनेत कमी प्रमाणात सुविधा, निम्न दर्जाच्या आहेत.
डॉ आंबेडकारानी हिंदू कोड बिलाद्वारे ब-याच कलमांतून स्त्रियांना वारसा हक्क, न्याय, समानता मिळवून देण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. शासकिय पातळीवर विविध योजनांव्दारे आर्थिक महिलांच्या सक्षमीकरणासाठी पाउले उचलली आहेत.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509S01V13P010
Download