उच्च शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : एक अभ्यास

उच्च शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : एक अभ्यास

Prof. Bhagvant B. Bahekar

G. N. Azad College of Social work, PUSAD 445204

Contact Number : 9850310590

E-mail Id. :  bbbahekar@gmail.com

सारांश (Abstract)

आजच्या जागतिक ज्ञानयुगात उच्च शिक्षण संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य ठरला आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढली असून, विद्यार्थ्यांना ज्ञानस्रोतांच्या अमर्याद उपलब्धतेची दारे खुली झाली आहेत. स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग, MOOC, डिजिटल लायब्ररी, क्लाउड कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आभासी वास्तव (VR) व मिश्र वास्तव (AR) या साधनांनी शिक्षण प्रक्रियेत क्रांतिकारी बदल घडवले आहेत. मात्र या बदलांबरोबर डिजिटल दरी, इंटरनेट व वीज सुविधांचा अभाव, शिक्षकांच्या डिजिटल कौशल्याची कमतरता, सायबर सुरक्षेचे प्रश्न अशी काही आव्हानेही समोर आली आहेत. प्रस्तुत लेखात उच्च शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर, त्याचे फायदे-तोटे, आव्हाने व उपाय तसेच भविष्यातील तांत्रिक प्रवाहांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.

मुख्य शब्द : आधुनिक तंत्रज्ञान, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, ई-लर्निंग, MOOCs, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लायब्ररी, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509S01V13P002

Download