ग्रंथालय क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्ताः आधुनिक ज्ञान व्यवस्थापनाची नवसंजीवनी
श्री. एन. एन. लोखंडे
ग्रंथपाल
जी. ए. कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली
इमेलः nlokhande07@gmail.com
सारांश
आजच्या डिजिटल युगात माहितीचा वेग वाढलेला आहे. माहितीचा विस्फोट झालेला आहे. नवनवीन शोध लागत आहेत. नवनवीन शाखा उदयास येत आहेत. तसेच माहितीचा शोध घेणारा वाचक अधिक सक्रिय व तंत्रस्नेही बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर पारंपारिक ग्रंथालय सेवांना नवसंजीवनी देण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) हे तंत्रज्ञान अधिक उपयुक्त ठरत आहे. इंटरनेट, डिजिटल संग्रह आणि मोबाईल तंत्रज्ञानाच्या प्रगतीने ज्ञान वितरणाचे स्वरूप बदललेले आहे. या बदलांच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) आहे. कृत्रिम बुध्दिमत्ता केवळ संगणकीय गणितापुरती मर्यादीत नसून निर्णय घेणे, समस्या सोडविणे आणि मानवी मेंदूच्या कार्यपध्दतीचे निराकरण करणे, कार्यपध्दतीची नक्कल करणेची क्षमता असलेले तंत्रज्ञान आहे. नक्कल करणेची क्षमता असलेले तंत्रज्ञान ही माहितीच्या नवयुगातील अतिशय महत्वाची संकल्पना असून ग्रंथालयशास्त्रात ती एक क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0030
Download