विद्यार्थ्यांमधील स्व नियंत्रणाचा अभ्यास
प्रा. डॉ. दिनेश जारोंडे
मानसशास्त्र विभाग प्रमुख,
इंदिरा महाविद्यालय कळंब, ता. कळंब
जि. यवतमाळ मो. ९४०३२५७००६
सारांश –
आपल्या कार्यावर नियंत्रण राहणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आपण जेही कार्य करतो आहे त्यातील चांगल्या पद्धतीने होण्यासाठी स्व नियंत्रण साधने अतिशय महत्त्वाचे आहे. काही वेळेस, काही गोष्टी वरती आपण खूप लवकर प्रतिक्रिया देतो आणि प्रतिक्रिया दिल्यानंतर मग आपल्याला विचार येतो. असे केलेले कार्य हे उत्तम होत नाही किंवा त्यांनी स्वतःला समाधान सुद्धा लाभत नाही. या उलट स्व नियंत्रण साधले जाते तेव्हा मात्र विचारपूर्वक कार्य होते व त्याचे समाधान सुद्धा उत्तमपणे लाभते. यालाच लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमधील स्व नियंत्रणाचा शोध घेणे या संशोधनाचा महत्त्वाचा विषय होता. हे संशोधन 40 बी एड प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर करण्यात आले. त्यातून खूप चांगल्या पद्धतीची स्व नियंत्रण क्षमता अल्प विद्यार्थ्यांत व बहुसंख्य विद्यार्थ्यांची स्व नियंत्रण पातळी सामान्य दिसून आली.
मुख्य शब्द – स्व, नियंत्रण, विद्यार्थी
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2508S01V13P024
Download