मराठी कथा साहित्यामधून आलेले स्त्री चित्रण : एक अभ्यास

मराठी कथा साहित्यामधून  आलेले स्त्री चित्रण : एक अभ्यास

मार्गदर्शक डॉ.सोपानदेव पिसे,

प्राध्यापक, मराठी विभाग सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा, उमरेड रोड, नागपूर

संशोधक कु.साक्षी विनोदराव वातकर,

स्नातकोत्तर मराठी विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

सारांश

ग्रामीण मराठी साहित्यामधून आलेली प्रेरणा तिचे स्वरूप हे कथेच्या माध्यमातून आलेले आहेत. म्हणूनच ग्रामीण कथाही स्त्री-दृष्टिकोनातून बघितले असेल तिचे चित्रण वास्तविकतेच्या बळावर उभे केल्याची दिसते. वास्तविकता आणि कल्पना यामधून केलेली तुलना यांचे कथानक हे कशा पद्धतीने वास्तवदर्शी जीवनाचा आरसा आपल्यासमोर उभा करतो त्यामधूनच निर्माण होणारी कथासृष्टीही ग्रामीण व प्रादेशिक तत्त्वावर आधारलेली आहे. साठोत्तरी मराठी साहित्यामध्ये स्त्रीवादी चळवळी उभ्या राहिल्या. परंतु काही पुरुष लेखक सुद्धा स्त्रीवादाच्या भावना समजून घेऊन समाधानकारकपणे आपल्या कथा साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण नागरी स्त्री जीवनाचे दर्शन सुद्धा घडत होते. म्हणूनच ग्रामीण जीवनातील स्त्री व तिचे चित्र कथा साहित्यामधून येणे ही संकल्पना आणि कलाकृती नाविन्यपूर्ण वाटते.

बीज शब्द

वास्तवदर्शी, संवेदनशील, वैदर्भीय, भावोत्कटता, अभिलाषी, अविष्कारण

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I01S01V13P0006

Download