सायबर गुन्हेगारी प्रतिबंधित धोरणे, आव्हाने व उपाययोजना
डॉ. ज्योती जी. नाकतोडे व प्रा. आम्रपाली ए. भिवगडे
आठवले समाजकार्य महाविद्यालय, भंडारा
गोषवारा
सायबर गुन्हेगारी ही माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे उद्भवलेली एक गंभीर समस्या आहे. हॅकिंग, डेटा चोरी, ऑनलाइन फसवणूक, सायबर टेररिझम आणि रॅन्समवेअर हल्ले यांसारखे गुन्हे जागतिक स्तरावर वाढत आहेत. या संशोधनात सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यांच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध कायदे व धोरणे तसेच प्रभावी उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण (2013) यांसारखी धोरणे अस्तित्वात असली तरी त्यांची अंमलबजावणी अजूनही प्रभावी नाही.
सायबर गुन्हेगारी प्रतिबंधासाठी तांत्रिक उपाय, कठोर कायदे, जनजागृती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाचे आहेत. सायबर सुरक्षा शिक्षण आणि डिजिटल साक्षरतेच्या प्रसारावर भर देणे आवश्यक आहे. प्रभावी सायबर सुरक्षा धोरणे केवळ तांत्रिक उपायांपुरती मर्यादित न राहता, कायदेशीर सुधारणा आणि समाजातील जागरूकता वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0062
Download