किशोरवयीन मुलींना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव : एक सामाजिक दृष्टिकोन
प्रा. मनिषा पाटील (पाचभाई )
(बी.ए. मानसशास्त्र, समाजशास्त्र, बी.एड, एम.ए. संप्रेषण, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, (A) एम.एस.समुपदेशन)
य. च. मु. मुक्त विद्यापीठ पनवेल (माजी प्राध्यापक)
ईमेल:- manishapachbhai@gmail.com
मोबाईल क्रमांक :- 9082669586
१.१ प्रास्ताविक / पार्श्वभूमी
लहान मुला मुलींना चांगल्या वाईट स्पर्शाची जाणीव नसते. असे असले तरी ब-याच किशोरवयीन मुलींना चांगले वाईट स्पर्शातील फरक कळतो. व ते कळण्याची संवेदना प्रत्येक जीवनमध्ये जन्मतः असते. मानव वनस्पती व प्राणी यांना ही या स्पर्शाची जाणीव आहे.
चांगला स्पर्श, वाईट स्पर्श कळायलाच हवा. तेवढी जागरुकता त्यांच्यात निर्माण व्हावी. आपल्याला जन्मतः च नैसर्गिक वरदानच दिलेले आहे. चांगला, वाईट स्पर्श ओळखण्याचे. पण एखादे वेळी चटकन लक्षात येणार नाही. चांगला स्पर्श तर जन्माला आल्यापासून च कळतो. उदा:- लहान मुलांना वाईट स्पर्श कळतो म्हणून मुले त्यांच्या कडे जात नाही. जबरदस्तीने घेतले तर रडतात. परंतु वाईट स्पर्शाच्या जाणीवा लवकर कळत नाहीत. उदा:- आईचा स्पर्श, बाबांचा स्पर्श, आजी आजोबांचा स्पर्श, भावंडांचा स्पर्श, मित्र मैत्रिणींचा स्पर्श ….व सर्वात महत्त्वाचा अनोळखी व्यक्तीचा स्पर्श इ.
आज समाजात नको तितके स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे काही किशोरवयीन मुले लैंगिकदृष्ट्या काही समानलिंगाच्या तर काही सर्व लिंगाच्या लोकांकडे आकर्षित होतात. आपण काय करत आहोत याची त्यांना जाणीव राहिली नाही. व परिणामाची चिंता म्हणावी तितकी नाही. व समजून घेण्यासाठी आजिबात स्वारस्य नाही.
महत्वाची शब्दावली :- Adolescent girls, Good and Bad touch, Self defense
DOI Link –https://doi.org/10.69758/GIMRJ/2407II03V12P0030
Download