शिक्षकांचे संघटनात्मक नागरिकत्व वर्तन आणि ताण यांच्यातील संबंधाचा अभ्यास
प्रा. मनीषा लाकडे
मानसशास्त्र विभाग,
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
सारांश – संघटन हे समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. कुठलेही कार्य एकट्याने करण्यापेक्षा समूहाने केले तर लवकर व कमी श्रमात होते म्हणूनच Unity is the best policy असे म्हटले जाते. शाळा ही समाज निर्मित संस्था असून मानवी व अमानवी घटकाच्या सहकार्याने ती कार्यरत असते. शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक हा घटक महत्वपूर्ण आहे. शिक्षकाला विविध भूमिका पार पाडत असताना शिक्षकांचे मानसिक आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे कारण शिक्षकाला महत्त्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. विद्यार्थ्यांना अध्यापन करावे लागते, मुख्याध्यापकांना प्रशासकीय कामात हातभार लावावा लागतो तर सहकाऱ्यांना समस्या नीराकरणासाठी मदत करावी लागते म्हणून त्यांना ताण येऊ शकतो.
परंतु ताण येण्याच्या पाठीमागे कारणे कोणती याचा विचार केला तर शिक्षकाला त्याची भूमिका स्पष्ट नसल्याने किंवा मनाविरुद्ध काम करावे लागल्याने त्याच त्याच बाबी कंटाळावाण्या वाटल्याने टाळण्याची शक्यता आहे. शिक्षकाने जर इतरांशी जास्तीत जास्त आंतरक्रिया साधून विचारांचे आदान प्रदान केले तर त्याला त्याची स्व संकल्पना स्पष्ट होऊन वातावरणात होणाऱ्या घटनांचा व घटकांचा संबंध योग्य प्रकारे जोडून समन्वय साधता येईल म्हणजेच संघटनात्मक नागरिकत्व वर्तन हे शिक्षकाला भूमिकेतील स्पष्टता विरुद्ध भूमिका अपेक्षात्मक भूमिका संघर्ष व स्थगिती या बाबी कमी करण्यासाठी मदत पूर्ण ठरू शकते.
त्याकरिता सदर संशोधनात संघटनात्मक नागरिकत्व वर्तन व ताण याचा काही संबंध असू शकेल का ? हे अभ्यासासाठी याचा विचार करण्यात आला.
मुख्य शब्द – संघटनात्मक नागरिकत्व वर्तन, ताण आणि संबंध
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0022
Download