डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार व शिक्षण प्रसारासाठी केलेल्या कार्याचा चिकित्सक अभ्यास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार व शिक्षण प्रसारासाठी केलेल्या कार्याचा चिकित्सक अभ्यास

उमेश श्रीरंग उबाळे

विद्यार्थी ( एम ए इतिहास)

य. च. मु विद्यापीठ, नाशिक

केंद्र-एल आर टी कॉलेज, अकोला

मोबाईल न –७८२२८०६४२२

इमेल-umeshsubale@gmail.com

सारांश

आपण पाहतो शिक्षणासाठी भारत देशामध्ये अनेक समाज सुधारकांनी कार्य केले आहे. जसे महात्मा ज्योतिबा फुले, रवींद्रनाथ टागोर, पंजाबराव देशमुख यांनी भारत देशामध्ये शिक्षण प्रसारासाठी कार्य केले आहे. त्याच प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. त्याकाळात शिक्षणाचा एवढा प्रसार झाला नव्हता. समाज मागासलेला होता. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते. स्त्रिया व मागास समाज हा शिक्षणापासून वंचित होता. समाजात त्यांची अवस्था खुपच वाईट होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना प्रगती पथावर आणण्यासाठी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. शिक्षणच समाजात जागुती व परिवर्तन घडवून आणू शकते या विषयी बाबासाहेबांची खात्री झाली होती. शिक्षणाने मानवत डोळसपणा येतो. चुकीच्या गोष्टी विषयी समजतात. व्यक्तीला प्रगती पथावर आणता येते. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वाना शिकण्याचे आव्हान केले. समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांनी लोकांच्या प्रबोधनासाठी अनेक दौरे काढले. आपल्या भाषणामधून त्यांनी लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी समाज प्रबोधनासाठी वृतपत्र काढले. वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजात प्रबोधन घडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मागास समाजातील लोकांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट पटवून दिली. भारतीय संविधानात सुद्धा त्यांनी शिक्षणाविषयी तरतुदी केल्या. अशाप्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण प्रसारासाठी अतिशय मोलाचे कार्य केले.   

बीज शब्द – मागास समाजाचे शिक्षण, बहिष्कृत समाज, शिक्षण प्रसार, शिक्षण संस्था स्थापन,  शिक्षणाचे महत्व, बहिष्कृत समाज, पीपल्स एज्युकेशन सोसायटी.             

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2604S01V14P012

Download