भारतातील महिला सक्षमीकरणाचे धोरण आणि महिलांची सद्यस्थिती

भारतातील महिला सक्षमीकरणाचे धोरण आणि महिलांची सद्यस्थिती

प्रा. सुनील बी. उईके

आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा

मो. नं. ८१४९३६५८१७

सारांश:-

            स्त्री ही मानवी सजीव सृष्टीची जननी आहे. तसेच ती मानवाच्या उत्पत्तीची जननी सुद्धा आहे. स्त्री व पुरूष या निसर्गाने निर्माण केलेल्या मानवी जाती परस्परावलंबी आहेत. म्हणूनच संसाराचा रथ योग्य पद्धतीने चालविण्यासाठी स्त्री व पुरूष या दोघांचीही भुमिका महत्त्वाची असते. कोणत्या एकट्याने संसाराचा रथ योग्य पद्धतीने चालू शकत नाही. दोघेही महत्त्वाचे असले तरी समाजामध्ये महिलांच्या तुलनेत पुरूष यांना महत्त्वाचे स्थान आणि दर्जा देण्यात आलेला आहे. याच कारणांमुळे महिला पुरूशांच्या तुलनेत मागे पडलेल्या आहेत. महिलांमध्ये स्व: जाणिवांचा विकास करणे, तिच्या हक्क व अधिकारांविषयी तिला जागृत करणे, तिला निर्णय घेण्यास सक्षम बनविणे यासाठीच शासनाने महिला सक्षमीकरणाचे धोरण स्विकारले आहे. 2011 हे वर्ष भारताने महिला सक्षमीकरणाचे वर्ष म्हणून साजरे केले. यावर्शी देशातील महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या सशक्त बनविण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P110

Download