भारतीय ज्ञान परंपरेत विदर्भातील हलबा संस्कृतीचे महत्त्व : प्राथमिक व दुय्यम माहितीवर आधारित अध्ययन

भारतीय ज्ञान परंपरेत विदर्भातील हलबा संस्कृतीचे महत्त्व : प्राथमिक व दुय्यम माहितीवर आधारित अध्ययन

रुचिरा राधेश्याम भुरे

संशोधक

समाजशात्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

सारांश (Abstract)

भारतीय ज्ञान परंपरा ही विविध प्रादेशिक, लोक व आदिवासी संस्कृतींनी घडवलेली अनुभवाधारित ज्ञानप्रणाली आहे. विदर्भातील हलबा समाजाची संस्कृती या परंपरेचा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रस्तुत संशोधन लेखाचा उद्देश भारतीय ज्ञान परंपरेच्या चौकटीत विदर्भातील हलबा संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. या अभ्यासात प्राथमिक व दुय्यम अशा दोन्ही प्रकारच्या माहितीचा वापर करण्यात आला आहे. प्राथमिक माहिती क्षेत्रभेटी, मुलाखती व निरीक्षण पद्धतीद्वारे संकलित करण्यात आली असून दुय्यम माहिती ग्रंथ, संशोधन लेख व शासकीय अहवालांवर आधारित आहे. अभ्यासातून असे दिसून येते की निसर्गाधिष्ठित जीवनदृष्टी, मौखिक परंपरा, लोककला, पारंपरिक कृषी व औषधोपचार ज्ञान यांच्या माध्यमातून विदर्भातील हलबा संस्कृती भारतीय ज्ञान परंपरेला समृद्ध करते.

कीवर्ड्स: भारतीय ज्ञान परंपरा, विदर्भ, हलबा संस्कृती, प्राथमिक माहिती, आदिवासी ज्ञान

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P071

Download