भारतीय ज्ञान प्रणाली आणि महिला सक्षमीकरण परंपरा ,परिवर्तन आणि आधुनिक संदर्भ
सौ नम्रता भुरे
श्री बिंझाणी सिटी कॉलेज (स्वायत्त ), उमरेड रोड, नागपूर
सारांश : हा शोध निबंध महिला सक्षमीकरणासाठी लागणाऱ्या प्रेरणादायी उपक्रमासाठी तयार करण्यात आला आहे. प्रस्तुत शोधनिबंधात शैक्षणिक विश्लेषणात्मक व संशोधनात्मक उद्दिष्टे समोर ठेवून भारतीय ज्ञान परंपरेच्या प्रवाहात महिला सक्षमीकरणाचा सामाजिक व सौधांतिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.तसेच भारतीय ज्ञान परंपरा आणि महिला सक्षमीकरण यातील परस्पर संबंधांचा सामाजिक ,सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे.
भारतीय ज्ञान परंपरेत महिलांचे स्थान महत्त्वाचे मानले गेले आहे. पूर्वी महिला शिक्षण ,तत्त्वज्ञान , धर्म आणि समाज जीवनात सक्रिय सहभागी होत्या.भारतीय ज्ञान व्यवस्थेत स्त्रीचे स्थान ‘चूल आणि मूल ‘ एवढेच न राहता भौतिक ,सामाजिक आणि नैतिक जीवनाच्या केंद्रस्थानी होते.महिला सक्षमीकरण ही संकल्पना जागतिक पातळीवर चर्चा करताना भारतीय ज्ञान परंपरेतील स्त्रीविषयक दृष्टिकोनाचा पुन्हा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले.
मुख्य शब्द (Keywords) :
भारतीय ज्ञान परंपरा ,महिला सक्षमीकरण ,परंपरा व परिवर्तन ,स्त्रीवाद ,मानवतावाद ,समाजवाद ,सामाजिक समता , आधुनिक भारत ,सांस्कृतिक संदर्भ ,समताधिष्ठितता , लोकशाही ,सर्वसमावेशक सर्जनशीलता
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P045
Download