बौद्ध तत्वज्ञानाची वर्तमान सामाजिक समस्यांच्या निराकरणात उपयुक्ततता आणि संयुक्तीक्ता: समाज-तत्त्वज्ञानात्मक विश्लेषण
डॉ. बाबा प. शंभरकर
सहायक प्राध्यापक
अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, वर्धा
सारांश
वर्तमान जगात हिंसाचार, भेदभाव, सामाजिक-आर्थिक असमानता, पर्यावरणीय -हास, मनोसामाजिक आरोग्य समस्या, राजकीय ध्रुवीकरण, समुदाय जीवनातील क्षीण होणे अशा असंख्य सामाजिक संकटांची वाढ होत आहे. मानवी जीवनात विकासाला निश्चित स्थान आहे परंतु तांत्रिक किंवा केवळ आर्थिक प्रगतीने जीवन समृद्ध आणि सफल होत नाही त्यामुळे पराकोटीच्या विकास योजनामधून मनोसामाजिक समस्यांचे उत्तर मिळत नाही. या पार्श्वभूमीवर निसर्गनियमावर प्रचलित करुणा, समता, शहाणपण आणि नैतिकतेवर आधारलेला बौद्धधर्म आधुनिक समाजासाठी एका सर्वसमावेशक उपाययोजनेचे तत्त्वज्ञान म्हणून समोर येतो तथा सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य राखतो. हा लेख बौद्धधर्म आजच्या सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी का आणि कसा प्रभावी आहे याचे समाजशास्त्रीय, तत्त्वज्ञानात्मक, मनोवैज्ञानिक आणि राजकीय विश्लेषण सादर करतो. बौद्ध धर्मातील चार आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग, प्रतीत्यसमुत्पाद, अहिंसा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनि सूचित केलेला नवयान बौद्धधर्म—यांच्या आधारे सामाजिक परिवर्तनाची संपूर्ण चौकट प्रस्तावित होते. संशोधनातून असे निदर्शनास येते की बौद्धधर्म केवळ धर्म नाही तर सामाजिक संरचना, मानवी मन आणि शासनव्यवस्थेच्या आरोग्याचे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे आधुनिक सामाजिक संकटांच्या मुळांवर उपाय करण्यास सक्षम असलेली ही एकमेव समग्र व मानवीय दृष्टीकोनाची यंत्रणा आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P019
Download