महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला सशक्तीकरणासाठीच्या योजनांचा अभ्यास
प्रा. डॉ. प्रशांत विनायकराव बुकणे,
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिम-444505
prashant.bukne@gmail.com. 9822715454
सारांश:
महाराष्ट्र सरकारद्वारे महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातात, जसे की उज्ज्वला योजना, वन स्टॉप सेंटर, नारी अदालत, महिला हेल्पलाईन, शक्ति सदन योजना, स्वाधार योजना, पोषण अभियान, बेबी केअर किट योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना इत्यादी. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत, संरक्षण, आरोग्य सेवा, शिक्षणाच्या सुविधा आणि रोजगाराच्या संधी दिल्या जातात.
सरकारच्या या उपक्रमांमुळे महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होत आहे. मात्र, अनेक योजना असूनही अद्याप सर्व महिलांना त्यांचा पूर्ण लाभ मिळत नाही, कारण योजनांची पुरेशी माहिती आणि अंमलबजावणीतील तफावत मोठी समस्या आहे. त्यामुळे महिलांसाठी जागरूकता मोहिमा आणि स्थानिक पातळीवरील सहभाग वाढविण्याची आवश्यकता आहे. महिला सशक्तीकरण हा सतत चालणारा प्रवास असून त्यासाठी समाज आणि शासनाने एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I01S01V13P0004
Download