नोकरदार उच्चशिक्षीत महिलांवर कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक शारीरिक, आर्थिक व लैंगिक छळ आणि कायदयाची सुरक्षा – एक अभ्यास
सुधा किशन पवार, संशोधक विद्यार्थी, शिक्षणशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
Emaill ID : sudhachavanr@gmail.com
डॉ. वाय.व्ही. पवार, सहाय्यक प्राध्यापक, फोस्टर डेव्हलपमेंट कॉलेज ऑफ एज्यूकेशन, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
प्रस्तावना :-
चूल आणि मूल करणं अशी सिमीत संकल्पना खरतर स्त्रीबाबतची कधीच पुसली गेली आहे. सुरुवातीच्या काळात आपल्या कुटूंबाला आर्थिक पाठबळ निष्ठा या उददेशाने स्त्रीया घराबाहेर जाऊन काम करु लागल्या. आपापले व्यवसाय करु लागल्या. परंतु काळानुरुप तंत्र आणि यंत्राच्या बदलत्या काळात स्त्रिया विविध क्षेत्रात आज अगदी आघाडीवर काम करत आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत. स्त्री पुरुष जेव्हा एकत्र काम करतात त्या कामाच्या ठिकाणी खरंतर कोणताही भेदभाव न राहता एक व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी त्याला सुरक्षित आणि विश्वासार्ह वाटणं हे अत्यंत गरजेच असतं परंतु या अडथळयाची शर्यत पार करताना दुर्देवानं स्त्रियांना अनेक समस्यांना आणि संकटांना सामोरं जावं लागतं यापैकी एक अत्यंत गंभीर समस्या म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा मानसिक छळ या स्वरूपात, या प्रकारे नोकरदार सुशिक्षीत महिलांवर कामाच्या ठिकाणी अन्याय हा होत असतो. सदर शोधनिबंध मध्ये नोकरदार स्त्रियांवर कार्यस्थळी होणारा अन्याय त्याचे स्वरूप, प्रकार, कायदेशीर सुरक्षा काय आहे? ; या अभ्यास केला गेला आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2501I1VXIIIP0005
Download