वृद्धांच्या समस्यांचे समाजशास्त्रीय विश्लेषण

वृद्धांच्या समस्यांचे समाजशास्त्रीय विश्लेषण

सुरेखा धोंडीबाराव  राजूरकर,

संशोधक विद्यार्थिनी.

            प्रस्तुत शोध निबंधामध्ये संशोधिकेने मराठवाड्यातील ५० वृद्धांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या समस्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या शोधनिबंधामध्ये संशोधिकेने संकलित तथ्यांच्या आधारावर काही निष्कर्ष मांडले आहेत. संशोधकाच्या मते, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या उत्तरदात्यांकडे कुटुंबीय दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे त्यांना आरोग्यविषयक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढता व्यक्तिवाद, उपभोक्तावाद हे त्यांच्या वाढत चाललेल्या समस्यांचे मूलभूत कारण आहे. उच्चशिक्षित कुटुंबातील वृद्धाना अशिक्षित तथा कमी शिकलेल्या वृद्धांच्या तुलनेत अधिक समस्यांचा सामना करावा लागत आहे असेही दिसते यावरून भारतीय समाजातील कुटुंब संस्थेमध्ये वृद्धांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून भारतीय कुटुंबसंस्थेत सामाजिक विघटनाची प्रक्रिया सुरु झाली आहे असे म्हणावे लागते.

प्रमुख संकल्पना: वयकंप, वयोवर्धन, कृतिशील वृद्धत्व, कालक्रमानुसार वृद्धत्व, जैविक वृद्धत्व, दृश्य वृद्धत्व , मानसिक वृद्धत्व, सामाजिक वृद्धत्व

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2501I1VXIIIP0001

Download