महायोगी श्री. अरविंद घोष
डॉ. विलास आत्माराम देऊलकर
सहयोगी प्राध्यापक
बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविदयालय वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग
ई.मेल – vadewoolkar@gmail.com
सारांश –
शिक्षण म्हणजे सुक्ष्म क्षमता बाहेर आणणे आणि त्याचे संगोपन करणे याशिवाय दुसरे काही नाही. स्वत:शी एकरूप होणे व्यक्तीने समाज, देश आणि मानवतेशी सुसंवादीत राहणे. स्वत: एक संपूर्ण अस्तित्व किंवा अविभाज्य मानव बनवणे. श्री. अरविंद हे एक महान विचारवंत खात्रीशीर तर्कशुद्ध तात्विक प्रतिभावान होते. श्री. अरविंद यांना भारतीय राष्ट्रवादाचे पैगंबर म्हटले जाते. श्री. अरविंदांनी स्वराज्य हे आपले राजकीय उद्दिष्ट ठेवले होते. स्वराज्य हा शब्द वेदातून आला आहे. याचा अर्थ नैतिक आणि अध्यात्मिक स्वातंत्र्य आहे. श्री.अरविंदांच्या मते राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रत्येक राष्ट्राने अंतर्गत स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. श्री. अरविंद हे विसाव्या शतकाच्या सुरूवातीतील राष्ट्रवादी चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे बहुतेक लेखन वंदे मातरम व कर्मयोगी वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले आहे.
किवर्ड- अरविंद, योगी
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2412IV01V12P0017
Download