शिक्षणातील मुलींच्या गळतीची कारणे आणि उपाय
डॉ. सोमा पी. गोंडाणे
राजीव गांधी कला महाविद्यालय पाटण तालुका जीवती जिल्हा चंद्रपूर – ४४२९०८
bodhibandhu@gmail.com mo. No.9552020847
सारांश
भारतीय घटनेने सर्वांना समान अधिकार दिले असले तरी अजूनही भारतात मुलींना मुलांच्या बरोबरीचे अधिकार मिळत नाहीत. त्यातल्या त्यात मुलींना मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिले जात नाही असे गेल्या काही दिवसांतल्या पाहणीत आढळून आले आहे. एका सरकारी अहवालात हे सत्य नमूद करण्यात आले आहे. प्राथमिक शाळांत मुलींच्या प्रवेश घेण्याचे प्रमाण ४८.५ टक्के आहे. या पातळीवर मुलांच्या शिक्षणाचे प्रमाण मात्र ९० टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजे प्राथमिक शाळांत दोन मुले शिकतात तेव्हा एकच मुलगी शिकत असते. मुलांमध्येही शाळांतले गळतीचे प्रमाण खूप आहे पण ते मुलींच्या बाबतीत मुलांपेक्षा अधिक आहे. म्हणून शाळांत प्रवेश घेणार्या १०० मुलांपैकी २० टक्के मुले उच्च शिक्षणापर्यंत पोचतात पण मुलींमध्ये हे प्रमाण केवळ १७ टक्के आहे. २०१०-१ १ साली करण्यात आलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, उच्च शिक्षणाच्या आधीच्या म्हणजे उच्च माध्यमिक पातळीवरच्या शिक्षणातही स्त्री-पुरुष असमतोल कायम आहे. दहावी ते बारावी या पातळीवर ५५ टक्के मुले पोचतात पण तिथपर्यंत पोचणार्या मुलींचे प्रमाण ४५ टक्के असते. पदव्युत्तर पदवी मिळणार्या मुलांपैकी ६५ टक्के मुले डॉक्टरेट करण्याचा प्रयत्न करतात पण मुलींत हे प्रमाण केवळ ३८ टक्के आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2412IV01V12P0005
Download