किशोरवयीन मुलांना ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या नात्याकडे वाढणारा कल : एक सामाजिक दृष्टिकोन
………………………………………………………………………………………………….
प्रा. मनिषा पाटील (पाचभाई)
(बी.ए. मानसशास्त्र, समाजशास्त्र, बी.एड, एम.ए. संप्रेषण, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र(A), एम.एस.समुपदेशन)
य. च. मु. मुक्त विद्यापीठ पनवेल (माजी प्राध्यापक)
ईमेल:- manishapachbhai@gmail.com
मोबाईल क्रमांक:- 9082669586
…………………………………………………………………………………………………..
महत्वाची शब्दावली :- Live-in-relationship – Living together like a married couple without getting married
…………………………………………………………………………………………………..
- प्रास्ताविक:
स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थ
तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे. तेही आपणचं स्वतः आपल्याला सतत लोकांची बरोबरी करण्याची सवय व व्यसन लावून घेतले आहे.
अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी हि पिढी आत्मकेंद्री बनत चालली आहे.स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वयोवृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक समस्या व चिंताना जन्म देत आहे. कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करु शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. आजच्या पिढीला कसलीही जबाबदारी नको झाली आहे. फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही. कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या दृढ सहवासात. सद्य: स्थितीच्या कायद्याच्या तरतुदीनुसार स्त्री – पुरुष स्वतंत्र आहे. व व्यक्ती स्वतंत्र्याचा खरा अर्थ विसरले आहेत.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2411IV05V12P0009
Download