मराठी माध्यमाच्या इयत्ता 8 वी / अ मधील विद्यार्थ्यांना मराठी विषयामध्ये व्याकरणातील अलंकार ओळखण्यात येणा-या अडचणींचा अभ्यास आणि त्यावर उपाय

मराठी माध्यमाच्या इयत्ता 8 वी / अ मधील विद्यार्थ्यांना मराठी विषयामध्ये व्याकरणातील अलंकार ओळखण्यात येणा-या अडचणींचा अभ्यास आणि त्यावर उपाय

डॉ. मुग्धा प्रभाकर सांगेलकर

पल राजेन्द्र बी.एड कॉलेज

हनुमान नगर, कांदिवली पूर्व

मुंबई 400101

सारांश – मराठी भाषेमागील शास्त्रीय भूमिका समजावून घेण्यासाठी व्याकरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अनुकरणाने तसेच सवयीने भाषा उत्तम प्रकारे वापरता येत असली तरी व्याकरणाच्या अभ्यासाने भाषेचा समजून उमजून उपयोग करता येतो. व्याकरणाच्या अभ्यासाने लेखनातील आणि भाषणातील चूकांचे दिग्दर्शन करता येते. व्याकरण शिकल्यांनतर चुकांची चिकित्सा करणे शक्य होते. भाषेची जडणघडण  किंवा रचना समजण्याचे एक साधन म्हणून व्याकरणो अनन्य साधारण महत्त्व आहे.

व्याकरण हा वाड.मयाचा पाया आहे. योग्य अर्थज्ञान होण्यासाठी वाड.मयाच्या अभ्यांसकांना व्याकरणाच्या अभ्यासाची जरुरी आहे. एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर स्वभाषेच्या व्याकरणाचा अभ्यास आवश्यक ठरतो. दुसरी भाषा जलद गतीने शिकण्यासाठी आपल्याला भाषेच्या व्याकरणाचा उपयोग होतो. तसेच व्याकरणातील अंलकार हा महत्त्वाचा घटक आहे. व्याकरणात अंलकाराल अनन्यसाधारण महत्व आहे. या अंलकाराचे विविध प्रकार आपल्याला 8,9,10 च्या इयत्तेमध्ये असतात. अर्थालंकार व शब्दालंकार असे या अंलकाराचे दोन प्रकार आहे. भाषा सुंदर बनवण्यासाठी काही अलंकारीक शब्दांचा उपयोग केला जातो. त्यालाच भाषेतील अंलकार असे म्हणतात. या अंलकारामुळे भाषेला एक वेगळे रुप प्राप्त झालेले आहे. अंलकारीक शब्दांमुळे भाषा अध्यपनापर्यंत पोहचली आहे. कोणतेही कविता बनवताता अध्या अलंकारीक शब्दांचा उपयोग केला जातो. कवितेची रचना करताना एक प्रकारचा नाद, लय येणे आवश्यक असते म्हणून काही विशिष्ट शब्दांची भरण असते म्हणून काही विशिष्टय शब्दांची  भरण असणे गरजेचे असते याचीच जागा या अंलकारीक शब्दभरुन काढतात. अलंकारीत शब्दांमुळे कवितेला एक चांगल्याप्रकारची रचना करता येते, मराठी व्याकरणात या अलंकाराचा खूप महत्त्व आहे.

Keywords – व्याकरण, भाषा, अंलकार

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2411IV05V12P0005

Download