किशोरवयीन मुलांमुलींचे मानसिक संतुलन समृद्ध होण्यासाठी एखाद्या शास्त्रीय कलेचा अभ्यास: एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन

किशोरवयीन मुलांमुलींचे मानसिक संतुलन समृद्ध होण्यासाठी एखाद्या शास्त्रीय कलेचा अभ्यास: एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन

 प्रा. मनिषा पाटील (पाचभाई)

(बी.. मानसशास्त्र, समाजशास्त्र, बी.एड, एम..  संप्रेषण , शिक्षणशास्त्र , समाजशास्त्र (A), एम.एस.समुपदेशन)

. . मु. मुक्त विद्यापीठ पनवेल (माजी प्राध्यापक)

ईमेल:- manishapachbhai@gmail.com

मोबाईल क्रमांक:- 9082669586

मानव्य विद्या किंवा मानवीय कला यांना जगाच्या उत्पत्ती पासुन च महत्वाचे स्थान आहे. पंच्याऐशी लक्ष योनीमध्ये बोलून खूनावून, किंवा इशा-यामार्फत व्यक्त होण्याचे वरदान मानवाला मिळाले आहे. मनातल्या दुखावल्या गेलेल्या भावना जखमा व मानसिक संतुलन भरून काढण्यासाठी कला अत्यंत आवश्यक आहेत. तसेच आनंद सुख दुःख व्यक्त करण्यासाठी देखील कलेचा उपयोग होतो. कले मुळे वेदना, दु:ख, निद्रानाश, रोग, विकार, इ. तर कमी होतेच परंतु समोर उपस्थित झालेल्या आव्हानास वाट शोधताना मदत होते. स्वतःच्या अंतर्मनातील लवकर जोडण्याचे काम व शरीराचे आणि मनाचे विकार निवळण्यास कला मदत करते. व चित्तवृत्ती (मुड ) सुधारतो.

 मानसशास्त्रात मनाला व वृत्तीला महत्वाचे स्थान आहे. सर्व वयोगटातील मुले व व्यक्ती यांना कला व मानसशास्त्रीय थेरपी ची सांगड घालून मानवीय वर्तनातील भावनिक व मानसिक समस्येवर मात करण्यासाठी मदत होते.

महत्वाची शब्दावली :- किशोरवयीन मुलांच्या समस्या, मानसिक संतुलन, कला

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2408II05V12P0011

Download