झोपडपट्टी मधील महिलांचा सामाजिक व आर्थिक दर्जा सुधारण्यासाठीच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना : एक अभ्यास
डॉ. डी.एस. धारवाडकर
सहायक प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग प्रमुख
तोष्णीवाल आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज सेनगाव
जिल्हा हिंगोली, मो. 9130007444
मल्लीका दिगंबर हरदडकर
पी.एच.डी संशोधिका
सामाजिकशास्त्रे संकुल
स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड
मो. नं. 9765212859
Received on: 16 May ,2024 Revised on: 20 June ,2024 Published on: 30 June ,2024
सारांश : मानवी जीवनाचे मुख्य दोन आधारस्तंभ आहेत. ते दोघेही समाज बनवण्याकरीता एक समान महत्वाचे आहेत आणि ते एकमेकांवर अवलंबुन असतात. जेव्हा पासून या पृथ्वीवर मानवप्राण्याचा उद्य आणि विकास झाला तेव्हा पासून या समाजातील पुरुष कोणत्या न कोणत्या कारणास्तव समोरे येत असते. जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्त्रीयांच्या विकासासाठी अवरित प्रयत्न करत आलेला आहे. परंतु झोपडपट्टी मधील अनेक स्त्री या अशा आहेत की त्यांना आपले जीवन हे अतिशय हालाकीच्या परीस्थीतीमध्ये घालवावे लागत आहे आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वेळोवेळी या झोपडपट्टी मधील महिलांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी विविध योजना तयार करत असते आणि या माध्यमातुनच त्या महिलांना सक्षमीकरणाच्या प्रवाहात आनणे शक्य आहे.
मुख्य शब्द : समानता, पिळवणुक, स्वातंत्र्य, जबाबदारी, महिला सक्षमीकरण, झोपडपट्टी, सामाजिक दर्जा आणि आर्थिक दर्जा.
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2406IIV12P014
Download