Vipassana is a scientific meditation practice

Vipassana is a scientific meditation practice

विपश्यना वैज्ञानिक ध्यानसाधना

प्रा. डॉ. बंडू एस. मानवटकर

सहयोगी प्राध्यापक पाली विभाग प्रमुख

मधुकरराव पवार कला महाविद्यालय मुर्तीजापुर, जि.अकोला.  Pin No. 444607.

Mo. No. 7020942105  / E-mail-  bsmanwatkar@rediffmail.com

सारांश :-

        तथागत भगवान बुद्धाने कठोर अशी तपश्चर्या करून त्यांनी आपल्या भिक्खू संघाला व उपासकाना मनोविकार नष्ट करण्याकरिता तसेच आपल्या इंद्रियावर ताबा मिळविन्याकरिता शरीर शुद्ध व मन शुद्ध करण्याकरिता विपस्सना हि एक ध्यान साधना विकसित केली आहे. फार प्राचीन अशी हि ध्यानसाधना स्वत:च्या अनुभूतीतून सहा वर्ष कठीण तपस्चरीया करून तथागत भगवान बुद्धाने संसारातील लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून भिक्षु संघाला महास्तीपठ्ठान सुत्ताचा उपदेश दिलेला आहे. विपश्यनेची प्रक्रिया शरीर आणि मन यांच्यातील खोल संबंध समजून घेण्यावर आधारित आहे. यामध्ये साधक आपल्या श्वासो श्वासावर लक्ष केंद्रित करतो आणि तटस्थ वूत्तीने शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदनाचे हळूहळू निरीक्षण करतो. हे निरीक्षण ध्यान करणाऱ्यांना त्याच्या मध्ये खोल शांतता आणि संतुलन विकसित करते. विपश्यने चा उद्देश दु:खापासून मुक्ती तसेच राग, द्वेष, अहंकार, इत्यादी कोणत्याही प्रकारची मानसिक अशुद्धता नष्ट करण्यासाठी उपुक्त आहे.

मुख्य शब्द :- विपस्सना करण्याचे फायदे, ध्यान साधनेचे मानवी जीवनात महत्व, बुद्ध आणि विपस्सना, विपस्सना एक शरीर विज्ञान, बुद्धाने सांगीतलेले महासतीपटठाण सुत्त.     

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2408II04V12P0011

Download