शिवकालीन स्वराज्य : एक अध्ययन

शिवकालीन स्वराज्य : एक अध्ययन

अमितकुमार गणेश शिंगणे

संशोधक विद्यार्थी

एम. इ. एस. कॉलेज मेहकर,

जिल्हा बुलढाणा.

मो. नं. 99222 38998

ईमेल – amitshingane@gmail.com

सारांश

भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या. या राजवटींनी भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केले. मोगल साम्राज्य हे सोळाव्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. सन 1700 च्या सुमारास मोगल साम्राज्य जवळ जवळ भारतभर पसरले होते. सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात होऊन सन 1857 साली ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेऊन मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला. त्यानंतर 1857 ते 1947 दरम्यान भारताचे साम्राज्य ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिले. या सर्व कालखंडामध्ये म्हणजे सतराव्या शतकाच्या मध्यात महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराज हे एक हिंदू राजे होते; परंतु त्यांनी सर्वधर्म समभाव जोपासून मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व जाती धर्माचे स्वराज्य उभारले. जे स्वराज्य आज 350 वर्षानंतर देखील सर्वांना सर्वश्रुत आहे. ते शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या ध्येय धोरणामुळे आणि त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे. त्यामुळे शिवकालीन स्वराज्य हे वर्तमान काळात देखील आपले आदर्श स्थान कायम ठेवून आहेत.

Keyword –शिवकालस्वराज्य धार्मिक आणि सामाजिक सलोखा,  शिवाजी महाराज.

Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2406IIV12P013

Download