सार्वजनिक महसूल : भारत एक दृष्टीक्षेप
डॉ. एस. एम. कोल्हापूरे
सहाय्यक प्राध्यापक,
अर्थशास्त्र विभाग,
विलिंग्डन महाविद्यालय, सांगली
९८३४३३८९१७
Received on: 16 May ,2024 Revised on: 20 June ,2024 Published on: 30 June ,2024
गोषवारा:
सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला निरनिराळ्या मार्गाने प्राप्त होणारी एकूण मिळकत होय. शासन देशातील जनतेसाठी विविध सुविधा निर्माण करण्याचे कार्य करत असते. ते कार्य करण्यासाठी विविध मार्गाने उत्पन्न मिळवावे लागते. त्याचे दोन मार्ग किंवा स्त्रोत आहेत. एक कर मार्ग आणि दुसरा करेतर मार्ग. कररूपी उत्पन्नामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा समावेश होतो, तर करेतर उत्पन्नामध्ये शुल्क, दंड, देणगी, सार्वजनिक उद्योगांचा नफा आदींचा समावेश होतो. भारत सरकारच्या एकूण प्राप्तीमध्ये महसुली प्राप्ती म्हणजेच कर आणि करेतर उत्पन्न, ज्याच्यातून देयता निर्माण होत नाहीत. तर भांडवली प्राप्तीमध्ये सार्वजनिक कर्जाचा, ज्यातून देयता निर्माण होतात यांचा समावेश होतो. महसुली उत्पन्नामधील करांच्या माध्यमातून भारत सरकारला बिगर कर महसुलाच्या तुलनेत अधिक उत्पन्न प्राप्त होते. सन १९८०-८१ मध्ये एकूण कररुपी महसुलामध्ये अप्रत्यक्ष करांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण अधिक होते. नंतरच्या कालावधीत या प्रमाणामध्ये घट झाली आहे. सध्या (२०२३-२४) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचे कररुपी उत्पन्नामध्ये जवळपास समप्रमाण आहे. तसेच भारत सरकारच्या एकूण उत्पन्नामध्ये महसुली प्राप्तीचे प्रमाण भांडवली प्राप्तीच्या तुलनेने अधिक आहे.
मुख्य शब्द : सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, महसुली प्राप्ती, भांडवली प्राप्ती, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, निर्गुंवणूक.
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2406IIV12P021
Download