Need, role and challenges of women leadership for community development

Need, role and challenges of women leadership for community development

समाजाच्या विकासासाठी महीला नेतृत्वाची गरज, भूमिका आणि आव्हाने

सहा.प्राध्यापक बळीराम मा भांगे

जोतिराव फुले समाजकार्य महाविद्यालय, उमरेड

balirambhange@gmail.com

7057671035

सारांश – समाजाच्या विकासामध्ये महिलांच्या विविध क्षेत्रातील कामगीरीने विशेष भर टाकली असली, तरी विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या महीलांना त्याच्या कार्यक्षेत्रात कार्य करत असतांना, विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना मिळणाऱ्या संधीचा दर्जा हा महिलांचे सामाजिक नेतृत्व करण्यास भाग पाडतो. या विषयाचा अभ्यास आपण सर्वेक्षणात्मक करणार आहोत. समाजामध्ये महिलांना योग्य दर्जा मिळावा. महिलांकडे पाहण्याचा सामजिक दृष्टीकोन बदलावा ही उद्दिश्टे या अभ्यासात महत्वाची ठरतात. समाजाच्या विकासात महीलांची भूमिका, षैक्षणीक, सामाजीक व कौटुंबीक दृष्ट्या फार महत्वाची असली तरी देखिल, तिच्यापुढे येणारी आव्हाने ही कमी होत नाही, येणाऱ्या आव्हानांना तिला तोंड देण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी नवनिर्मितीचे मुल्यमापन करणे गरजेचे आहे. लैंगिक असमानतेला समूळ नष्ट करून समानतेच्या विचारांचे बीजारोपण हे प्रत्येक क्षेत्रात करणे ही आजच्या काळाची गरज आहे. महिलां सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाला जागरूकता वाढवून त्याप्रती सहकार्य करणे आवश्यक झाले आहे.

मुळ शब्द – संधी, उद्दिष्टे, दृष्टीकोन, क्षमता, मूल्यमापन, समानता, बिजारोपण आणि जागरूकता

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2408II04V12P0012

Download