नांदेड शहरातील बालकामगाराच्या समस्यांचे समाजशास्त्रीय अध्ययन
डॉ. डी.एस. धारवाडकर
सहायक प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग प्रमुख
तोष्णीवाल आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज सेनगाव
जिल्हा हिंगोली, मो. 9130007444
दिगंबर फकीरराव हरदडकर
पी.एच.डी संशोधिका
सामाजिकशास्त्रे संकुल
स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड
मो. नं. 9765212859
Received on: 16 May ,2024 Revised on: 20 June ,2024 Published on: 30 June ,2024
सारांश :
कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील बालकांवर अवलंबून असते. बालक हे देशाचे भविष्य घडविणारे असतात. पण ज्या वयात त्या बालकांना आपले बालपण आनंदाने जगायचे असते त्या वयात अनेक बालक हे शिक्षण घेणे किंवा खेळण्यासोबत खेळण्या ऐवजी त्यांना नाईलाजास्त काम करावे लागत असते. या मध्ये असे अनेक बालक आहेत की जे धोकादायक उद्योगांमध्ये काम करत असतात आणि त्यामुळे त्यांना अनेक रोगाची लागण होत असते आणि त्यातुनच काही बालकांचा मृत्यू सुध्दा होत असतो. मागिल पाच दशकाच्या नियीमत योजना, कल्याणकारी कार्यक्रम, विधी निर्माण आणि प्रशासकीय कार्य करत असून सूध्दा भारतातील अनेक बालक हे बालमजुरी करतांना आपणास दिसून येतात.
प्रस्तुत शोध पेपर मध्ये नांदेड शहरामध्ये विविध ठिकाणी काम करणाऱ्या बालकाच्या समस्यांचे अध्ययन करण्यात आले आहे. नांदेड शहर हे मराठवाड विभागमधील एक प्रगत शहर असून त्यांचा विकासाचा दर हा अन्य शहरांच्या तुलनेत अधिक आहे. या शहरामध्ये अनेक मोठ मोठे उद्योग, हॉटेल्स व अन्य ठिकाणी अनेक बालमजुर हे काम करताना आपणास दिसून येतात.
मुख्य शब्द : बालकामगार, शहरीकरण, उद्योग व्यवसाय, मनोचिकित्सा, अत्याचार.
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2406IIV12P015
Download