राजर्षी शाहू महाराजाची सामाजिक समताः एक अध्ययन

राजर्षी शाहू महाराजाची सामाजिक समताः एक अध्ययन

प्रा. डॉ. सिध्दार्थ शिवाजी वाठोरे

कला व विज्ञान महाविद्यालय कामरगाव

ता. कारंजा लाड जि. वाशिम

सारांश महाराष्ट्राच्या प्रबोधन कालखंडामध्ये सामाजिक समतेचा विचार मांडणारे थोर समाजसुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख केला जातो. भारताची सामाजिक व्यवस्था वर्णव्यवस्थेवर आधारीत आहे. या व्यवस्थेत ब्राम्हण क्षत्रिय, वैष्य व शुद्र असे चार वर्ण तसेच अतिशुद्र असा अलिखीत वर्ण आहे. या वर्ण व्यवस्थेत ब्राम्हण, क्षत्रिय वैष्य या वर्णास खुप जास्त अधिकार प्राप्त झाले आहेत. तसेच शुद्र व अतिशुद्र या वर्णास अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सोबतच या व्यवस्थेत जातीव्यवस्थाही विद्यमान असल्यामुळे समाज गटागटात विभागला आहे. त्यामुळे ही व्यवस्था विषमतावादी व बहुसंख्य लोकांचे अधिकार नाकारणारी व्यवस्था ठरते या व्यवस्थेत बहुसंख्य लोकांचे शोषण होते. भारतीय समाजाची निर्मीती समाताधिश्ठित व्यवस्थेवर करायची असेल तर ही व्यवस्था पुर्णपणे बदलली पाहीजे. तिचा धिक्कार केला पाहीजे असा मुलभूत विचार राजर्षी शाहू महाराजांनी मांडला आले. त्यांच्या समताधिश्ठित नवसमाजाची संकल्पना कशी आहे त्यांच्या मधील या विचाराविषयी असलेली समानता दर्शविण्याचा उद्देश प्रस्तुत शोध निबंधातून करण्यात आला आहे.

मुख्य शब्द राजर्षी शाहू महाराज,  समाज, समता, अध्ययन

Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0016

Download