शिवपूर्वकालीन महाराष्ट्र – एक अध्ययन
अमितकुमार गणेश शिंगणे
संशोधक विद्यार्थी
एम. इ. एस. कॉलेज मेहकर,
जिल्हा बुलढाणा.
सारांश – शिवपूर्वकाळात भारताच्या उत्तरेला मोगल तर दक्षिणेत (महाराष्ट्र) कुतुबुशाही, आदिलशाही, बरीदशाही, इमादशाही या शाह्यांनी आपली सत्ता स्थापन केलेली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात पोर्तुगिजांनी अगोदरच आपली सत्ता स्थापन केली होती. इंग्रच, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्याच्या माध्यमातून वखारीच्या स्वरूपात प्रवेश केला होता. अहमदनगर आणि विजापूर हे निजामशाहा आणि आदिलशाहा या दोन सुलतानानी आपसात वाटून घेतले होते. त्यांनी मनाची उदारता न दाखवता प्रजेवर अन्याय, अत्याचार, जुलूम करीत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर असल्याने त्यांच्यात नेहमी लढाया होत आणि रयतेचे हाल होत त्यामुळे तेथील रयत सुखी नव्हती. उघडपणे सन – उत्सव साजरे करणे, पुजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय-अत्याचार माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते, देशावर प्रेम नव्हते; प्रेम होते ते फक्त वतनावर. या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंदाधुदी माजली होती. अशा प्रकारे शिवपूर्वकालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक परिस्थिती ही अतिशय रसातळाला गेलेली असल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात विद्रोहाची भावना निर्माण होत होती. त्या भावनेला नेतृत्वाची गरज होती जी शिवाजी महाराजांनी पूर्ण करून स्वराज्य निर्मिती केली. त्यामुळे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र अभ्यासणे महत्त्वाचे ठरते.
Keyword – शिवपूर्वकालीन, महाराष्ट्र, अध्ययन, सत्ता स्थापन
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0004
Download