छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यावरणीय दृष्टिकोन

छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यावरणीय दृष्टिकोन

 मुळीक वसुदेव प्रभू

 (संशोधक विद्यार्थी)

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर   

डॉ. उमेश . साळूंखे

 (मार्गदर्शक)

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लोककल्याणकारी राज्य स्थापन करणारा जगातील एकमेव आदर्श राजा होय. ­या महान राजाचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील  शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वराज्यप्रेरक शहाजीराजे  भोसले यांच्या पोटी झाला. शहाजीराजे व जिजाऊ माँसाहेब यांनी बालशिवाजीला स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, सातत्य, मुत्सद्दीपणा, राजकारण, युद्धकला, शस्त्रकला, शास्त्र, धर्मशास्त्र, भाषाशास्त्र, निर्भीडप्रवृत्ती, शूरपणा, वीरता, नेतृत्व, लोकसंग्रह, शिक्षण, उद्योग, व्यापार, अर्थशास्त्र, स्त्रियांचा आदर, विज्ञानवादी दृष्टिकोन, माणसांची पारख, प्रजाहित, न्यायदान इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये पारंगत करण्यासाठी शिक्षण दिले. त्या शिक्षणातून व संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.

Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2406IIV12P008

Download