Anna Bhau Sathe and the United Maharashtra Movement
अण्णा भाऊ साठे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ
डॉ. विलास आत्माराम देऊलकर
सहयोगी प्राध्यापक
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला
जिल्हा – सिंधुदुर्ग पिन नं. ४१६ ५१६
इमेल – vadewoolkar@gmail.com
सारांश :-
भारत स्वतंत्र झाल्यावर राज्य निर्मितीसाठी आयोग स्थापन करण्यात आले. या आयोगाने मुंबई महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती इथल्या मराठी लोकांनी या निर्णयाविरोधात संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारली होती. त्यात राजकीय नेते, पत्रकार, शाहीर व विद्यार्थी सहभागी होते. त्यात अण्णाभाऊ साठे सुद्धा सहभागी होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे रणशिंग फुंकले. लालबावटा कलापथक त्यांनी स्थापन केले. या पथकाने शाहीरी, तमाशा, लोकनाट्य सादर करून जनमत निर्माण केले. गावखेड्यात ही चळवळ डफाच्या थापेवर पोहोचली होती. लालबावटा या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांचा खरपुस समाचार घेतला. अण्णाभाऊ साठे त्या काळातील महत्त्वाचे प्रसार माध्यम ठरले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या कार्याचा विसर आजच्या पिढीला पडलेला दिसतो. म्हणूनच त्यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा अभ्यास करण्यात आला.
की वर्ड :- संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अण्णाभाऊ साठे, शाहीर
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2408II04V12P0013
Download