संत तुकारामांच्या व्यक्तित्वातील काव्यदर्षन
डॉ. बळीराम राऊत
प्राध्यापक (मराठी विभाग)
जोतीराव फुले समाजकार्य महाविद्यालय उमरेड
Mob % 9767278720/9356229389
Email % baliramraut37@gmail.com
सारांष
संत तुकाराम महाराज महाराश्ट्राच्या संतपरंपरेतील युगपुरूश होते. षुद्रातील षुद्र समाजाचे जननायक होते. त्यांनी समाजातील तळागळातील हलाखिचे जीवन व्यतीत करीत असलेल्या लोकांना आपल्या काव्यषक्तीने कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृतीचे महान कार्य केले. भूतदया, मानवतावादी दृश्टीकोण, करूणा लोकांना षिकविली.
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा।।
यातून सेवा, प्रेमभाव, साधू-संताचा आदर ह्यातच परमात्माचा निवास हे साध्याषब्दातून तत्वज्ञानाची षिकवण दिली. तुकाराम महराज महाराश्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक, परिवर्तनाचे बीज आहेत. तत्कालीन समाजात दांभिकांचा वाढलेल्या स्वैराचावर प्रहार करून डोळस दृश्टी सर्वसामान्यांना दाखविली. ज्ञानेष्वरांनी घालून दिलेल्या भागवत धर्माची परिवर्तननात्मक परंपरा जनसामान्यात बळकट करून डोळस भक्तीमार्ग सांगीतला. तुकारामाच्या भाशा साधी-सुलभ सर्वसामान्यांच्या परिचयाची त्यामुळे तुकाराम लोकांना आपलेसे वाटतात. त्यांच्या काव्याची भाशा समजणारी असल्यामुळे खेड्याापाळ्याातील जनतेला त्यांचे अभंग, काव्य मुखोदगत होते. तुकाराम महाराज साक्षातकारी संत नसून कार्यकर्तृत्वान पुरूश होते. त्याचे षब्द व्रजाहून कठीण तर प्रसंगी लोण्याहून मऊ. तुकारामांनी वाईट प्रथावर प्रहार चढवून अंधश्रद्धेच्या गर्गेतून समाजाला वर काढण्याचे महान कार्य केले. ते संतच नाही तर खरेखुरे समाजसुधारकही होते.
मुख्यषब्द:- युगपुरूश तुकाराम, भूतदया, मानवता, करूणा, महाराश्ट्राची सांस्कृतीक अस्मिता, दांभिकांचा स्फोट, अंधश्रद्धा, समाजसुधारणा, प्रभावी काव्य, सामाजिक तत्वज्ञान.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2511S01V13P024
Download